प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! फानी चक्रीवादळामुळे 74 ट्रेन रद्द

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! फानी चक्रीवादळामुळे 74 ट्रेन रद्द

भारतीय रेल्वेनं 74 ट्रेन रद्द केल्या आहेत. प्रवशांची सुरक्षा लक्ष घेत रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

ओडिशा, 01 मे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फानी हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने सरकत आहे आणि अधिकाधिक तीव्र होत आहे. हवामान खात्याने हे वादळाचं रुपांतर extremely severe cyclone अर्थात अतितीव्र चक्रीवादळात झाल्याचं बुधवारी स्पष्ट केलं. याला गंभीरतेने घेत भारतीय रेल्वेनं 74 ट्रेन रद्द केल्या आहेत. प्रवशांची सुरक्षा लक्ष घेत रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

ओडिशाच्या भदरकपासून ते विजियानगरमच्या दरम्यानची रेल्वे सेवा 2 मे रोजी बंद करण्यात येणार असल्याची सांगण्यात येत आहे. यापुढे काही दिवस रेल्वेच्या वेळेनुसार प्रवासाचं नियोजन करा असा सल्ला ईस्ट कोस्ट रेल्वेनं प्रवाशांना दिला आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर आणि पुरीकडे जाणाऱ्या गाड्या देखील 2 तारखेच्या सांयकाळपासून रद्द करण्यात येणार आहेत.

या रेल्वेदेखील होणार रद्द

रेल्वे सेवा रद्द करण्याच्या निर्णयानंतर ईस्ट कोस्ट एक्सप्रेस, कोरोमंडल एक्सप्रेस 2 मेपासून हावडा इथून धावणार नाहीत. तर पुरी पासून हावडापर्यंत जाणाऱ्या गाड्या 2 मे रोजी रात्री रद्द करण्यात येणार आहेत.

हावडा इथून, बंगळुरू, चेन्नई आणि सिंकदराबादपर्यंत जाणाऱ्या गाड्यादेखील 2 तारखेला रद्द करण्यात येणार आहेत. भुवनेश्वर आणि पुरी इथून धावणाऱ्या सर्व गाड्या 3 तारखेपासून रद्द करण्यात येणार आहे.

तीर्थयात्रेसाठी आलेल्या भाविकांना परत पाठवलं

फानी चक्रीवादळाचा अंदाज घेत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तीर्थयात्रेसाठी पुरीमध्ये आलेल्या भाविकांना परत जाण्याचे आदेश ओडिशा सरकारने दिले आहेत. तर रेल्वेच्या वेळापत्रकानुसार यात्रेचं नियोजन करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्रदिनी घातपात : Ground Zero वरून आलेले पहिले फोटो; सुरुंग स्फोटात 16 जवान शहीद

पुरीतून पर्यटकांनी निघून जाण्याच्या सूचना

ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या पुरीला या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या शहरात आलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना तातडीने किनारा सोडून जायची सूचना प्रशासनाने केली आहे.

ताशी 205 किमी वेगाचे वारे

हवामान खात्याने हे वादळाचं रुपांतर extremely severe cyclone अर्थात अतितीव्र चक्रीवादळात झाल्याचं बुधवारी स्पष्ट केलं. यामुळे किनाऱ्यावर ताशी 205 किमी वेगाने वारे वाहू शकतात. यापूर्वी भारतात धडकलेल्या तितली वादळात 60 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापेक्षाही फानी वादळ तीव्र असू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

FANI चक्रीवादळ झालं आणखी तीव्र; 4 दशकातलं सर्वात मोठं वादळ या दिवशी धडकणार

गालच्या उपसागरात निर्माण झालेलं फानी हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने सरकत आहे आणि अधिकाधिक तीव्र होत आहे. हवामान खात्याने हे वादळाचं रुपांतर extremely severe cyclone अर्थात अतितीव्र चक्रीवादळात झाल्याचं बुधवारी स्पष्ट केलं. पूर्व किनारपट्टीच्या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेशला वादळापासून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 3 किंवा 4 मे पर्यंत हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्याला धडकू शकतं, असा अंदाज आहे.

विशाखापट्टणमच्या पूर्वेला 600 किमी अंतरावर आणि पुरीपासून 800 किमी अंतरावर हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकत आहे. किनाऱ्यावर धडकेल तेव्हा ताशी 200 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्रात प्रचंड मोठ्या लाटा उसळू शकतात.

भारतीय हवामान खात्याने हे वादळ एप्रिलमध्ये निर्माण झालेलं गेल्या 40 वर्षांतलं सर्वात मोठं वादळ असू शकेल, अशी शक्यता वर्तवली आहे. हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असू शकतो, असंही भारतीय हवामान खात्याचे संचालक के. जे. रमेश यांनी द हिंदूला सांगितलं. 25 एप्रिलपासून हे वादळ बंगालच्या उपसागरात निर्माण व्हायला सुरुवात झाली. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि हवेच्या स्थितीमुळे त्याची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. हे वादळ जितकं जास्त समुद्रावरून वाहेल तितकी त्याच्यातलं बाष्प वाढत जाईल आणि परिणामी किनाऱ्यावर धडकताना त्याची तीव्रता वाढत जाईल.

या चक्रीवादळाचा तडाखा ओडिशाबरोबरच आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांना बसण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने या राज्यांना 1086 कोटींचा निधी देऊ केला आहे.

VIDEO : गडचिरोलीत जिथे स्फोट घडला 'त्या' परिसरात पोहोचला न्यूज18 लोकमतचा प्रतिनिधी, संपूर्ण आढावा

First published: May 1, 2019, 6:36 PM IST

ताज्या बातम्या