News18 Lokmat

Fani Cyclone : वादळी पाऊसवाऱ्यातच 'त्या' 3 महिलांना प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि...

ओडिसामध्ये 3 महिलांची सुखरूप प्रसुती करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 3, 2019 11:59 AM IST

Fani Cyclone :  वादळी पाऊसवाऱ्यातच 'त्या' 3 महिलांना प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि...

भुवनेश्वर, 03 मे : फानी चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकला आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशातील नागरिकांना आता प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलं आहे. शिवाय, प्रशासन देखील फानीचा सामना करण्यासाठी सज्ज झालं आहे. संपूर्ण खबरदारी घेत ओडिशातील गंजाम येथील 3 लाखांपेक्षा जास्त लोकांना  सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. यावेळी 541 गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामधील 3 महिलांची प्रसुती झाली असून मुल आणि आई सुखरूप आहेत. ओडिसामध्ये जवळपास 4000 एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

फानी चक्रीवादळ धडकणार याचा खबर लागताच डॉक्टर देखील सज्ज झाले होते. त्यानंतर 541 गर्भवती महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. यावेळी 3 महिलांच्या प्रसुती वेदना सुरू झाल्या. अखेर डॉक्टरांच्या टीमनं त्याची सुखरूप प्रसुती केली.






Fani Cyclone : नागरिकांना मदतीचा हात द्या; राहुल गांधींचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश

10 हजार गावांना बसणार फटका

फानी चक्रीवादळामुळे ओडिशातील जवळपास 10,000 गावं आणि 52 शहरांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 11.5 लाख लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे.

फानी चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर आज धडकणार आहे. हे वादळ ओडिशाच्या दिशेनं सरकलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फानी चक्रीवादळ वेगानं पुढे सरकत आहे. आज दुपारपर्यंत हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता होती, मात्र हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सकाळी 8 ते 10 वाजेदरम्यानच फानी चक्रीवादळ पुरी शहरातील गोपाळपूरमध्ये पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत 11 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.


फानी चक्रीवादळाचं रौद्र रुप, जीव धोक्यात घालून नागरिकांनी काढला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2019 10:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...