ओडिशातल्या 'कासवां'ना आधीच मिळाली होती 'फानी' चक्रीवादळाची चाहुल!

ओडिशातल्या 'कासवां'ना आधीच मिळाली होती 'फानी' चक्रीवादळाची चाहुल!

काही प्राण्यांना अशा संकटांची चाहुल फार आधीच लागते. त्यांना हवामान खात्याच्या सूचनेची काहीही गरज पडत नाही.

  • Share this:

भुवनेश्वर 03 मे : फानी चक्रीवादळाने शुक्रवारी ओडिशाला झोडपून काढलं. 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं. रेल्वे आणि विमान सेवा बंद ठेवण्यात आली. या वादळात 6 लोकांचा बळी गेला. हवामान खात्याला कळण्याआधी समुद्र काठावर राहणाऱ्या कासवांना या चक्रीवादळाची चाहुल आधीच आली होती अशी माहिती आता पुढे येत आहे.

ओडिशातल्या गंजम जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी लाखो कासवं प्रजननासाठी येत असतात. ऑलिव्ह रिडले जातीचे हे कासव समुद्र किनाऱ्यावर घर तयार करतात आणि अंडी घालतात. दरवर्षी त्यांच्या हा क्रम असतो. मात्र यावर्षी अतिशय कमी कासव समुद्रकिनाऱ्यावर आल्याची माहिती भारतीय वनसेवेचे अधिकारी प्रविण कासवान यांनी ट्विटरवरून दिलीय.

कासवान यांनी ट्विटरवर म्हटलंय की, ओडिशातल्या रुसीकुलया समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी कासव अंडी घालण्यासाठी येतात. पण यावेळी त्यांची संख्या अतिशय कमी होती. काही प्राण्यांना अशा संकटांची चाहुल फार आधीच लागते. त्यांना हवामान खात्याच्या सूचनेची काहीही गरज पडत नाही.

पण वनविभागाने म्हटलंय की ही कासवं का आली नाहीत त्याचं नेमकं कारण सांगता येत नाही. मागच्या वर्षी या किनाऱ्यावर 4 लाख 75 हजार कासवं आली होती. यावर्षी त्यांची संख्या ही फक्त 3 हजार होती. असं असलं तरी 2002, 2007 आणि 2016 मध्येही समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या कासवांचं प्रमाण हे अतिशय कमी होतं.पश्चिम बंगाललाही तडाखा

ओडिशाला झोडपल्यानंतर 'फानी' हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने सरकलं आहे. शनिवारी सकाळपर्यंत ते बंगालच्या उपसागरात पोहोचणार आहे. प्रचंड सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने ओडिशातल्या किनारी भागाला शुक्रवारी जोरदार तडाखा दिला. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला तर कोट्यवधींचं नुकसान झालं. लाखो लोकांना आपलं घर दार सोडून सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला. खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी कोलकत्यातले सर्व मॉल्स बंद राहणार आहेत.

प्रचंड वेगाचा वारा

'फानी' चक्रीवादळामुळे ताशी 175 किमी वेगाने वारे वाहत आहेत. भुवनेश्वरचं विमानतळ आणि जनजिवन विस्कळीत झालंय. त्याचा आता तडाखा बंगाललाही बसणार असल्याने राज्यात हाय अलर्ट देण्यात आलाय. दोन दिवस सर्व शाळा कॉलेजेसलाही सुट्टी देण्यात आली आहे. कोलकत्यातला नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळही बंद करण्यात आलं आहे. 150 पेक्षा जास्त ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.

पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व मोठ्या मॉल्स आणि मार्केटला सुरक्षित उपायोजना करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. होणारी गर्दी आणि ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व छोटे मोठे मॉल्स, चित्रपटगृह, हॉटेल्स बंद राहणार आहेत. लोकांनीही बाहेर पडताना काळजी घ्यावी. अनावश्यक बाहेर पडू नये. वाहनं रस्त्यावर आणू नये अशी सूचनाही सरकारने दिल्या आहेत.

ओडिशाला तडाखा

फानी चक्रीवादळ आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं. यानंतर आता हे वादळ पश्चिम बंगालच्या दिशेनं पुढे सरकलं आहे. फानी चक्रीवादळाचा ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. दरम्यान, फानी चक्रीवादळाचा देशभरात फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. वादळामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.  उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात वादळीवारा आणि वीज कोसळून चार जणांचा तर सोनभद्र जिल्ह्यातीलही वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.

VIDEO अक्षरमंत्र भाग 19 : अक्षरांच्या सरावानंतर आता अकांचा सराव ; आजचे अंक - १, २, ३, ४


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2019 07:49 PM IST

ताज्या बातम्या