Fani Cyclone : फानी चक्रीवादळाचा देशभरात फटका, पाच जणांचा मृत्यू

Fani Cyclone : फानी चक्रीवादळाचा देशभरात फटका, पाच जणांचा मृत्यू

फानी चक्रीवादळामुळे ओडिशातील जवळपास 10,000 गावं आणि 52 शहरांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 11.5 लाख लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे.

  • Share this:

भुवनेश्वर,3 मे : फानी चक्रीवादळ आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं. यानंतर आता हे वादळ पश्चिम बंगालच्या दिशेनं पुढे सरकलं आहे. फानी चक्रीवादळाचा ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. दरम्यान, फानी चक्रीवादळाचा देशभरात फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. वादळामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात वादळीवारा आणि वीज कोसळून चार जणांचा तर सोनभद्र जिल्ह्यातीलही वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.

Live Updates :

भारतीय नौदलाकडून फानीबाधित भागात अन्नाचं वाटप सुरू

'समुद्रात बेपत्ता किंवा मृत्यू झाल्याची नोंद नाही'

पुरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

भुवनेश्वर : 32 वर्षांच्या महिलेनं चिमुकलीला दिला जन्म

पाच जणांचा मृत्यू

भुवनेश्वरमध्ये वादळीवाऱ्यामुळे झाडे कोसळली

आंध्र प्रदेश : वादळीवाऱ्यामुळे घरांचं प्रचंड नुकसान, 12 तास वादळीवारे कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पश्चिम बंगाल : दीघा परिसरातून 132 जणांची सुखरुप सुटका

कोस्ट गार्डकडून 4 बोटी आणि चेतक विमान तैनात

फानी वादळाची दिशा बदलली...

- फानी चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेनं सरकलं

- नागरिकांच्या मदतीसाठी नौदलदेखील सज्ज

दुर्घटना टाळण्यासाठी एनडीआरएफच्या हालचाली

ओडिशातील शाळा आणि महाविद्यालयं बंद

फानी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं, ताशी 170 किलोमीटर वेगानं वाहत आहेत वारे

ओडिशामध्ये मुसळधार पाऊस

आंध्र प्रदेश : विशाखापट्टणममध्ये वादळीवाऱ्याला सुरुवात

पुरीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, पुरीमध्ये ताशी 175 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत.

एनडीआरएफची टीम तैनात

पश्चिम बंगाल :दीघा बीचवरील दृश्य

ओडिशा : पुरी जिल्ह्यात फानी चक्रीवादळ धडकलं

-1 दशलक्षहून अधिक लोकांना असुरक्षित ठिकाणांहून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

- ओडिशात एनडीआरएफचे 4000 जवान तैनात

- पुरीपासून 70 किलोमीटर अंतरावर फानी चक्रीवादळ

- गोपालपूरमध्ये 100 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत.

- कोलकाता-चेन्नई रेल्वेमार्गावरील 223 रेल्वेगाड्या बंद

- फानी चक्रीवादळामुळे रेल्वे सेवा बंद, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी दीघापासून 50 बसेस सोडण्यात येणार आहेत.

- व्हिडीओ : पुरी जिल्ह्यामध्ये जोरदार वारे आणि पाऊस

- कोलकातातील दृश्य, फानी चक्रवादामुळे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता

- ओडिशातील गंजाम येथील 301460 लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. 541 गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

- ओडिशा सरकारनं आतापर्यंत तीन लाख नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं आहे.

- फानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक 1938 जारी करण्यात आला आहे.

- ओडिशातील जगतसिंहपूर जिल्ह्यातील ही दृश्य आहेत. जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- फानी चक्रीवादळ आज ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. परिसरात वेगवान वारे वाहत आहेत.

प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन

First published: May 3, 2019, 6:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading