फानी चक्रीवादळातून या कारणास्तव वाचले हजारो लोकांचे जीव

फानी चक्रीवादळातून या कारणास्तव वाचले हजारो लोकांचे जीव

फानीमुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी इस्त्रोनं मोठी जबाबदारी पार पाडली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 मे : ओडिसामध्ये फानी चक्रीवादळामुळे 16 लोकांनी आपला जीव गमवावा लागला. पण, यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आता ओडिसातील 10 हजार गावं आणि 52 शहरी भागांच्या पुर्नवसनाचं कार्य सुरू आहे. या मोठ्या संकटावर मात करण्याची, जीवितहानी रोखण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी पार पाडली ती ISROच्या उपग्रहांनी! कारण, ISROच्या उपग्रहांमुळे आगामी संकटाची सुचना मिळाली. त्यानंतर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

जवळपास आठवडाभरापूर्वी याबाबत कल्पना मिळाली होती. ISROचे उपग्रह यावर नजर ठेवून होते. उपग्रह दर 15 मिनिटांनी सर्व माहिती ग्राउंड स्टेशनला पाठवत होते. त्यामुळे फानी चक्रीवादळाबद्दल सर्व माहिती वेळीच उपलब्ध होत होती. परिणामी, बाधित होणाऱ्या भागांमधील सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी हवलणं शक्य झालं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी जीवितहानी देखील टळली.

गडचिरोली माओवादी हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडेंचा हात? 18 जणांविरोधात FIR

कोणत्या उपग्रहांची होती नजर

ISROच्या Insat-3D, Insat-3DR, Scatsat-1, Oceansat-2 आणि मेघा ट्रॉपिक्स या उपग्रहांची फानीवर सतत नजर होती. सॅटेलाईटनं दिलेल्या माहितीनुसार 10 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. फानीमुळे ओडिसातील 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला.

फानीमुळे ओडिसा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनानं सर्व ती खबरदारी घेत लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. फानी ओडिसामध्ये 43 वर्षानंतर पहिल्यांदा पोहोचला होता. शिवाय, मागील 150 वर्षामध्ये ओडिसामध्ये आलेलं फानी हे सर्वात मोठं चक्रीवादळ ठरलं. परिस्थितीचा अंदाज घेत याठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या होत्या.

अन् जंगलाच्या राजाशी कुत्र्यानं घेतला पंगा, VIDEO व्हायरल

First published: May 5, 2019, 11:08 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading