FANI चक्रीवादळ झालं आणखी तीव्र; 4 दशकातलं सर्वात मोठं वादळ या दिवशी धडकणार

FANI चक्रीवादळ झालं आणखी तीव्र; 4 दशकातलं सर्वात मोठं वादळ या दिवशी धडकणार

फानी चक्रीवादळ आणखी तीव्र झाल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका 4 राज्यांना बसणार आहे.

  • Share this:

पुरी (ओडिशा), 1 मे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फानी हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने सरकत आहे आणि अधिकाधिक तीव्र होत आहे. हवामान खात्याने हे वादळाचं रुपांतर extremely severe cyclone अर्थात अतितीव्र चक्रीवादळात झाल्याचं बुधवारी स्पष्ट केलं. पूर्व किनारपट्टीच्या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेशला वादळापासून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 3 किंवा 4 मे पर्यंत हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्याला धडकू शकतं, असा अंदाज आहे.

विशाखापट्टणमच्या पूर्वेला 600 किमी अंतरावर आणि पुरीपासून 800 किमी अंतरावर हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकत आहे. किनाऱ्यावर धडकेल तेव्हा ताशी 200 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्रात प्रचंड मोठ्या लाटा उसळू शकतात.

IPL 2019 : बंगळुरू विरुद्ध राजस्थानच्या सामन्याला 'फानी' वादळाचा फटका

हाय अलर्ट! फानी चक्रीवादळाचा 'या' राज्यांना बसणार तडाखा

भारतीय हवामान खात्याने हे वादळ एप्रिलमध्ये निर्माण झालेलं गेल्या 40 वर्षांतलं सर्वात मोठं वादळ असू शकेल, अशी शक्यता वर्तवली आहे. हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असू शकतो, असंही भारतीय हवामान खात्याचे संचालक के. जे. रमेश यांनी द हिंदूला सांगितलं. 25 एप्रिलपासून हे वादळ बंगालच्या उपसागरात निर्माण व्हायला सुरुवात झाली. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि हवेच्या स्थितीमुळे त्याची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. हे वादळ जितकं जास्त समुद्रावरून वाहेल तितकी त्याच्यातलं बाष्प वाढत जाईल आणि परिणामी किनाऱ्यावर धडकताना त्याची तीव्रता वाढत जाईल.

या चक्रीवादळाचा तडाखा ओडिशाबरोबरच आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांना बसण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने या राज्यांना 1086 कोटींचा निधी देऊ केला आहे.

पुरीतून पर्यटकांनी निघून जाण्याच्या सूचना

ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या पुरीला या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या शहरात आलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना तातडीने किनारा सोडून जायची सूचना प्रशासनाने केली आहे.

ताशी 205 किमी वेगाचे वारे

हवामान खात्याने हे वादळाचं रुपांतर extremely severe cyclone अर्थात अतितीव्र चक्रीवादळात झाल्याचं बुधवारी स्पष्ट केलं. यामुळे किनाऱ्यावर ताशी 205 किमी वेगाने वारे वाहू शकतात. यापूर्वी भारतात धडकलेल्या तितली वादळात 60 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापेक्षाही फानी वादळ तीव्र असू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

First published: May 1, 2019, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading