सुजीतचे बचावकार्य पाहत होतं कुटुंब, घरातल्या चिमुकलीचा टबमध्ये बुडून मृत्यू

सुजीतचे बचावकार्य पाहत होतं कुटुंब, घरातल्या चिमुकलीचा टबमध्ये बुडून मृत्यू

तामिळनाडुत बोअरवेलमध्ये पडलेल्या 2 वर्षीय सुजीतला वाचवण्यात अपयश आलं असतानाच आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे.

  • Share this:

तूतीकोरिन, 29 ऑक्टोबर : तामिळनाडुतील तिरुचिरापल्लीत 70 फुट बोअरवेलमध्ये पडलेल्या 2 वर्षीय सुजीत विल्सनला वाचवण्यात अपयश आलं. तीन दिवस सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आलं नाही. दरम्यान, यासोबतच आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. तूतीकोरिन इथं एक कुटुंब सुजितच्या बचावकार्याची बातमी टीव्हीवर पाहण्यात गुंग होते. त्यावेळी त्यांची 2 वर्षांची चिमुकली घराच्या बाथरूमजवळ खेळत होती. इकडं संपूर्ण कुटुंब टीव्ही पाहण्यात गुंग असताना मुलगी खेळत खेळत पाण्याच्या टबमध्ये पडली. तिथंच मुलीचा मृत्यू झाला.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तुतीकोरिनमधील थरेसपुरम गावात सोमवारी रात्री ही घटना घडली. 2 वर्षीय रेवती संजना बाथरूमजवळ खेळत होती. तेव्हा घरातील लोक टीव्हीवर सुजीतच्या बचावकार्यांच्या बातम्या बघत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाला मुलगी आसपास नसल्याचे बऱ्याच उशिराने समजलं. त्यानंतर मुलीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.

बाथरूममध्ये पाहिलं तेव्हा कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसला. चिमुकली पाण्याच्या टबमध्ये बुडाली होती. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

त्रिची जिल्ह्यात तब्बल 3 दिवस बोरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षीय सुजीत विल्सनचा मृत्यू झाला. गेल्या 3 दिवसांपासून त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी सुजीत हा बोरवेलमध्ये पडला होता. आज पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दिवाळीतला कहर VIDEO : ओठातल्या पेटत्या सिगरेटने रॉकेट उडवताना कधी पाहिलंय?

बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, बोरवेलमध्ये पडल्यानंतर बऱ्याच वेळाने सुजीत बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला बाहेर काढणं कठीण जात होतं. त्याचा श्वास सुरू होता पण 26 फुटांवरून तो 70 फूट खाली गेल्यानंतर त्याचा बचाव करणं अवघड झालं. मुलाला वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि राज्य पोलिस आणि स्थानिक प्रशासनासह अनेक पथकं काम करत होती. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

वाचा : अंडरवेअरमुळे सापडला बगदादी, हेराने पुरवली होती माहिती

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

Published by: Suraj Yadav
First published: October 29, 2019, 7:55 PM IST
Tags: tamilnadu

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading