Home /News /national /

एकाच कुटुंबातील तिघं कोरोना योद्धे, बाप लेकीसह जावई करतायेत रुग्णांची सेवा

एकाच कुटुंबातील तिघं कोरोना योद्धे, बाप लेकीसह जावई करतायेत रुग्णांची सेवा

सध्या कोरोनाच्या संकटात डॉक्टरांच्या कामाची तुलनात होऊ शकत नाही. आपला जीव धोक्यात घालून ते रुग्णांची सेवा करीत आहेत

    सुनील उपाध्याय/ छतरपूर, 22 एप्रिल : सध्याच्या कोरोनाच्या (Coronavirus) संकटात डॉक्टर लोकांसाठी देव बनले आहेत. स्वत:च्या जीवाची चिंता न करता आरोग्य कर्मचारी संक्रमित रूग्णांवर दिवस-रात्र उपचार करत आहेत. छतरपूरच्या जिल्हा रूग्णालयात कोरोना (Covid - 19) संकटात रुग्णांच्या सेवेसाठी एकाच कुटुंबातील तीन डॉक्टरही अशाच प्रकारे हातभार लावत आहेत. जिल्हा रूग्णालयात सिव्हिल सर्जन म्हणून तैनात असलेले डॉ. आरएस त्रिपाठी, त्यांची मुलगी डॉ. भावना त्रिपाठी आणि जावई डॉ. राजकुमार अवस्थी तिघेही कोरोना या साथीच्या आजारात एकाच रुग्णालयात योद्धा म्हणून उभे आहेत. वडील, मुलगी आणि जावई या तिघांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत रुग्णालयातील सर्व कोरोनाग्रस्त बरे होत नाहीत तोपर्यंत ते शांतपणे श्वास घेणार नाहीत. आरएस त्रिपाठी हे बालरोग तज्ज्ञ तसेच जिल्हा रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत. रुग्णालयाच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारीही त्याच्यावर आहे. मुलगी भावना त्रिपाठी स्त्रीरोग तज्ज्ञ असून रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करते. दुसरीकडे, जावई राजकुमार अवस्थी देखील वैद्यकीय अधिकारी असून जिल्हा रुग्णालयातच लोकांवर उपचार करत आहेत. सिव्हिल सर्जन त्रिपाठी यांचे म्हणणे आहे की, ते गेल्या अनेक आठवड्यांपासून आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत नाही. त्यांच्या खाण्यापिण्याची जागा नाही. हे तिघे सकाळी 10 च्या आधी रुग्णालयात पोहोचतात आणि रात्री उशिरा घरी जातात. राज्यातील डॉक्टरही सतत कोरोना इन्फेक्शनने त्रस्त असतात, पण या तिघेही डॉक्टर स्वत:पूर्वी रुग्णांचा विचार करतात. रुग्णांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. संबंधित - कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य मंत्र्यांकडून दिलासादायक माहिती हे लोक उपाशी का आहेत? लेकीच्या निष्पाप प्रश्नाने हेलावला शेतकरी; अशी केली मदत
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या