एका कोरोना योद्ध्याच्या कुटुंबाची लढाई, घरातील कर्ता गमावला आता पत्नी व मुलाचाही व्हायरसशी लढा

एका कोरोना योद्ध्याच्या कुटुंबाची लढाई, घरातील कर्ता गमावला आता पत्नी व मुलाचाही व्हायरसशी लढा

आतापर्यंत अनेक कोरोना योद्धांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी देशसेवेसाठी केलेले काम भारतीय कधीही विसरणार नाही

  • Share this:

सोनीपत, 09 मे : कोरोनाच्या (Coronavirus) संसर्गामुळे मृत्यू झालेल्या दिल्लीतील पोलीस कॉन्स्टेबल अमित राणा यांची पत्नी आणि 3 वर्षांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. सोनीपत स्वास्थ विभागाने दोघांनाही आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. अमित राणा हे सोनीपत गावात हुलहेडीत राहत होते. ते दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल पदावर होते.

दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमित राणा यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली होती. त्यांनी जवानाच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केलं. याबाबत अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, अमित यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना व्हायरसच्या या संकटात दिल्लीकरांची सेवा करीत राहिले. ते जनतेला वाचविण्यासाठी स्वत: संक्रमित झाले आणि आम्हाला सोडून गेले. मी त्यांच्या कर्तृत्वाला नमन करतो. त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची सन्मान निधी दिला जाईल.

अमित कुमार यांचा योग्यवेळी उपचार होऊ शकला नाही, असा आरोप त्यांच्या सहकार्यांकडून केला जात आहे. ते अधिकारी असते तर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते असेही यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित-गुजरातमध्ये 5 वर्षांपूर्वीपासूनच होता 'कोरोना'; आता झालाय सेल्फी पॉइंट

लॉकडाऊनमधील वेदनादायक कहाणी, बापानेच 8 महिन्यांच्या बाळाची निर्घृणपणे केली हत्या

First published: May 9, 2020, 7:35 AM IST

ताज्या बातम्या