मराठी बातम्या /बातम्या /देश /

मंदिर दर्शनासाठी निघालेलं कुटुंब गायब, घरावर चिकटवलेल्या नोटीसमुळे वाढलं गूढ

मंदिर दर्शनासाठी निघालेलं कुटुंब गायब, घरावर चिकटवलेल्या नोटीसमुळे वाढलं गूढ

पोलीस या कुटुंबातील सहा सदस्यांचा शोध घेत आहेत

पोलीस या कुटुंबातील सहा सदस्यांचा शोध घेत आहेत

पोलीस या कुटुंबातील सहा सदस्यांचा शोध घेत आहेत

  • Published by:  Meenal Gangurde
चंदीगड, 13 मार्च : पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील निहाल सिंगवाला या शहरातील एका कुटुंबातील 6 सदस्य गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. हिमाचल प्रदेशातील एका मंदिरात जात असल्याचे या कुटुंबीयांनी आपल्या नातेवाईकांना सांगितले होते. परंतु जेव्हा जवळच्या काही नातेवाईकांनी त्यांच्यांशी मोबाइलवर संपर्क साधला तेव्हा  कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाइल बंद होते. इतकेच नाही तर दुसर्‍याच दिवशी जेव्हा त्यांच्या दुकानासमोर या कुटुंबाची एक गाडी उभी असल्याचे आढळले, तेव्हा हे प्रकरण अधिक रहस्यमय झाले. हे कुटुंब रहस्यमयपणे गायब झाल्याबद्दल या शहरात अफवा पसरल्या आहेत. हे वाचा - भयंकर! आधी आला धून मग लागली आग, भररस्त्यात खासगी बसमध्ये अग्नितांडव कुटुंबातील प्रमुख तरसेम लाल (वय 60) हे व्यवसायाने तांदळाचे विक्रेते आहेत. सोमवारी ते आपली पत्नी संतोष राणी, मुलगा कृष्णलाल, वरुण आणि कृष्णलाल यांची पत्नी आणि दोन मुलांसह हिमाचलला रवाना झाले. पण दुसर्‍याच दिवशी त्याची गाडी तांदळाच्या दुकानासमोर उभी असल्याचं आढळून आलं. काय लिहिलयं नोटीसमध्ये.. तरसेम लाल यांच्या घरावर एक नोटीस चिकटविण्यात आली असून त्यामध्ये चार जणांची नावे लिहिली गेली आहेत आणि असे म्हटले आहे की, व्यवसायात झालेल्या नुकसानीसाठी हे कुटुंब जबाबदार आहे. व्यवसायात जे काही नुकसान झालं आहे ते या लोकांकडून वसूल केले जावे. या व्यवहारामुळे तरसेम लाल आणि त्याचे कुटुंब घरातून गायब झाल्याचा पोलिसांना संशय आहे. कुटुंबातील सदस्य गायब होण्यामागील खरे कारण अद्याप कोणालाही कळू शकलेले नाही. अद्याप पुरावा सापडला नाही तरसेम लाल यांचा मुलगा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य अचानक गायब झाले असून पोलीस त्यांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलिसांनी त्यांचे तांदळाचे दुकान आणि तरसेम लाल यांच्या घरी जाऊन तपास सुरू केला आहे. परंतु अद्याप या कुटुंबाविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीस तरसेम लाल आणि त्याच्या कुटुंबातील लोकांच्या कॉल डिटेलचीही चौकशी करीत आहेत. हे वाचा - ‘कोरोना’चा कहर : दफनविधीसाठी इराणमध्ये रात्रीतून मैदानात खोदल्या जाताहेत ‘कबर’
First published:

Tags: Crime, Punjab

पुढील बातम्या