धक्कादायक: सोयरीक करायला गेले आणि कोरोना घेऊन आले, 16 निघाले पॉझिटिव्ह

धक्कादायक: सोयरीक करायला गेले आणि कोरोना घेऊन आले, 16 निघाले पॉझिटिव्ह

तर नवरदेवाच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. हा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तर पोलिसांना संशय असून त्यांनी आणखी टेस्ट करायला कुटुंबाला सांगितलं आहे.

  • Share this:

हैदराबाद 18 मे: लॉकडाऊनच्या काळात गर्दी करू नका असं सरकार वारंवार सांगत आहे. गर्दीमुळेच कोरोनाचा प्रसार होतो त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवा एकत्र येऊ नका असा नियमही केला गेला. मात्र हे सगळे नियम पायदळी तुडवत सोयरीक करण एका कुटुंबाला जिवावरच बेतलंय. त्या कुटुंबातले १६ जण पॉझिटिव्ह आले असून नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. पण ह्रदयविकाराने हा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

हैदराबादच्या धुळपेट भागात हे कुटुंब राहते. ११ तारखेला त्यांच्या मुलाची सोयरीक होती. त्यांनी जवळच्याच एका हॉलमध्ये मोठा कार्यक्रम ११ मे रोजी केला. त्या कार्यक्रमाला २०० लोक होते असा दावा स्थानिक लोकांनी केला आहे.

त्याच लोकांनी ती माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी कार्यक्रम थांबवला आणि टेस्ट करायला सांगतिलं. आता त्यांचे रिपोर्ट्स आले असून २० पैकी १६ जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

तर नवरदेवाच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. हा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तर पोलिसांना संशय असून त्यांनी आणखी टेस्ट करायला कुटुंबाला सांगितलं आहे. एका चुकीमुळे त्या कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.

देशात आजपासून चौथ्या लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ५ हजार नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. पुढचे दोन महिने भारतासाठी अतिशय महत्त्वाचे असून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य आकडे लक्षात घेऊन सरकारनेही तयारी सुरू केली आहे. जुलैपर्यंत तब्बल १ कोटी लोकांच्या टेस्ट करण्याचं टार्गेट आखण्यात आलं आहे.

या 5 देशात हेल्थकेअर सर्वात भारी; कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर आणलं नियंत्रण

देशात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याच प्रमाणात सरकारने तयारी सुरू केली आहे. आत्तापर्यंतचा ग्राफ लक्षात घेता काही मॉडेल्सवर तज्ज्ञ काम करत आहेत. त्यांच्या मतानुसार जुलै महिन्यात ५ ते ७ लाख नवे रुग्ण येऊ शकतात. तर ऑगस्टमध्ये हाच आकडा १० लाखांपर्यंत जाऊ शकतो. ही वाढ लक्षात घेता सरकारने तयारी सुरू केली आहे.

बापरे! सावधान...ऑगस्टपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या जाऊ शकते 10 लाखांवर

 एवढ्या बेड्सची उपलब्धता, त्यांच्यासाठी लागणारी उपकरणं, मनुष्यबळ, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण अशा सर्व गोष्टींची तयारी करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत.

 

First published: May 18, 2020, 4:17 PM IST

ताज्या बातम्या