मराठी बातम्या /बातम्या /देश /

अजब! नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाड रात्रभर फिरलं गावात; पण नवरीचं घरच झालं गायब

अजब! नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाड रात्रभर फिरलं गावात; पण नवरीचं घरच झालं गायब

ठरल्याप्रमाणे वराकडची मंडळी बँड,बाजा-बारात घेऊन गावात हजर झाली. पण नवऱ्यामुलीचा पत्ताच नव्हता. अक्षरशः तिचा पत्ता शोधत हे वऱ्हाड गावभर हिंडलं अखेर निराश होऊन त्यांच्यावर गावी परतायची वेळ आली.

ठरल्याप्रमाणे वराकडची मंडळी बँड,बाजा-बारात घेऊन गावात हजर झाली. पण नवऱ्यामुलीचा पत्ताच नव्हता. अक्षरशः तिचा पत्ता शोधत हे वऱ्हाड गावभर हिंडलं अखेर निराश होऊन त्यांच्यावर गावी परतायची वेळ आली.

ठरल्याप्रमाणे वराकडची मंडळी बँड,बाजा-बारात घेऊन गावात हजर झाली. पण नवऱ्यामुलीचा पत्ताच नव्हता. अक्षरशः तिचा पत्ता शोधत हे वऱ्हाड गावभर हिंडलं अखेर निराश होऊन त्यांच्यावर गावी परतायची वेळ आली.

    वाराणसी, 14 डिसेंबर: लग्नाचं वऱ्हाड मोठ्या दणक्यात वाजतजगाजत नवऱ्यामुलीच्या गावात दाखल व्हायचं होतं. ठरल्याप्रमाणे वराकडची मंडळी बँड,बाजा-बारात घेऊन गावात हजर झाली. पण नवऱ्यामुलीचा पत्ताच नव्हता. अक्षरशः तिचा पत्ता शोधत हे वऱ्हाड गावभर हिंडलं अखेर निराश होऊन त्यांच्यावर गावी परतायची वेळ आली. पण लग्न ठरवणाऱ्या मध्यस्त महिलेला मात्र यात जबरदस्त फटका बसला. उत्तर प्रदेशात (Uttarpradesh) ही घटना घडली. पीलीभीत (Pilibhit) या ठिकाणी अलिकडेच लग्नाच्या दुसऱ्याचं दिवशी नवरदेव (Groom) अचानक रहस्यमयरीत्या गायब झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता नवऱ्या मुलीचं अख्खं खानदान गायब झालं आहे उत्तर प्रदेशातील आजमगढ (Azamgarh) इथून. त्यामुळे लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या नवरदेवला जबरदस्त धक्का बसला आहे. उत्तरप्रदेशातील आजमगढ येथील एका तरुणाचं मऊ जिल्ह्यातील एका तरुणीसोबत लग्न ठरलं होतं. हे लग्न 10 डिसेंबरला युवतीच्या घरी पार पडणार होतं. पण लग्नाच्या रात्री जेव्हा नवरदेव संपूर्ण वऱ्हाड घेऊन मऊ जिल्ह्यात नवरीच्या गावी गेला, तेव्हा नवरदेव संपूर्ण वऱ्हाड घेऊन नवरीचं घर शोधू लागला. पूर्ण रात्रभर फिरल्यानंतरही वऱ्हाडाला नवरीचं घर सापडलं नाही आणि तिच्या कुटुंबाचीही कसलीही माहिती मिळाली नाही. त्यामुळं संपूर्ण वऱ्हाडाला निराश होऊन गेल्या पावली परतावं लागलं. घडलेल्या सर्व प्रकरणामुळे नवरदेवाच्या नातेवाईकांचा राग अनावर झाला. त्यामुळं त्यांनी शनिवारी रात्री लग्न ठरवणाऱ्या महिलेलाच धरलं. तिला अक्षरशः ओलिस ठेवलं. या घडलेल्या प्रकारामुळे पोलिसही सुन्न झाले. बंधक बनवलेल्या महिलेनं दावा केला की, नवरीच्या कुटुंबाने तिचीही फसवणूक केली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी शमशेर यादव यांनी सांगितलं की, नवरदेवाच्या कुटुंबानं लग्न ठरवणाऱ्या महिलेच्याविरोधात गंभीर आरोप लावले आहेत. आम्ही चर्चेच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शनिवारी रात्री दोन्ही बाजूंनी समझौता झाला असून नवरदेवाच्या कुटुंबियांनी महिलेविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केली नाही. घडलेला सर्व प्रकार खूपच धक्कादायक होता. खरंतर काही दिवसांपूर्वी छतवारा येथे राहणारी एक महिला नवरदेवाच्या कुटुंबियांच्या  संपर्कात आली. या महिलेनं मुलाचं लग्न ठरवण्याचं आश्वासन दिलं, त्यासाठी मऊ जिल्ह्यातील मुलीचं स्थळ पाहण्यात आलं. दोन्ही कुटुंब लग्नासाठी तयारही झालं. पण लग्नाआधी मुलाचं कुटुंब मुलीच्या घरी गेलं नव्हतं, त्यामुळं हा सगळा प्रकार घडला. मुलीचं घर न पाहता लग्नाची तारीख ठरवली गेली, मुलाच्या कुटुंबाने मुलीकडील मंडळींना बँडबाजा आणि अन्य कार्यासाठी 20 हजार रुपये दिले होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Marriage

    पुढील बातम्या