मराठी बातम्या /बातम्या /देश /

ज्याच्या हत्येची केस केली बंद, तोच 2 वर्षांनी जिवंत परतला; पोलीस अधिकाऱ्यालाच झाली शिक्षा

ज्याच्या हत्येची केस केली बंद, तोच 2 वर्षांनी जिवंत परतला; पोलीस अधिकाऱ्यालाच झाली शिक्षा

2016 मध्ये एका युवकाच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक केली होती. दोन वर्षांनंतर हा तरुण जिवंत घरी परतला.

2016 मध्ये एका युवकाच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक केली होती. दोन वर्षांनंतर हा तरुण जिवंत घरी परतला.

2016 मध्ये एका युवकाच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक केली होती. दोन वर्षांनंतर हा तरुण जिवंत घरी परतला.

  • Published by:  Priyanka Gawde

ओडिशा, 12 नोव्हेंबर : ओडिशाच्या मानवाधिकार आयोगाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. प्रकरण एका खोट्या खटल्यात दोन जणांना अटक करण्याचे होते. 2016 मध्ये एका युवकाच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक केली होती. दोन वर्षांनंतर हा तरुण जिवंत घरी परतला. आता या प्रकरणात मानवाधिकार आयोगाने असे म्हटले आहे की दोन्ही व्यक्तींना अडीच-अडीच लाखांची भरपाई देण्यात येईल. ही भरपाई तत्कालीन तपास अधिकाऱ्यास देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या दोघांनाही तपास अधिकाऱ्यांनं अटक केल्याने पीकमळ पोलीस स्टेशनचे माजी आयआयसी प्रकाश कुमार कर्ण यांच्या पगारामधून अडीच लाख रुपयांची भरपाई रक्कम कपात करण्याची शिफारस समितीने केली. सूत्रांच्या माहितीनुसार, पगपाली गावचा जीतू दंडसेना 7 डिसेंबर 2016 रोजी बारगड जिल्ह्यातील पिकामल पोलिसांच्या हद्दीत बेपत्ता झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली 24 डिसेंबर 2016 रोजी हल्लू गुर्ला आणि बारगड शहरातील रागब नाईक याला अटक केली. त्यानंतर दोघांनाही तुरूंगात पाठवण्यात आले.

वाचा-4 कोटींसह चालकाने एटीएम व्हॅन पळवली, विरारमधील धक्कादायक घटना

दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली

बिस्वप्रिया कानुंगो, चंद्रनाथ आणि विजय कुमार पांडा या तिन्ही याचिकाकर्त्यांनी सांगितले की, तपास अधिकाऱ्याने बेपत्ता झालेल्या युवकाच्या मोबाइल फोनसह दोघांना अटक केली आहे. नंतर दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुमारे एक वर्ष तो तुरूंगात राहिला आणि त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. याचिकाकर्त्याने असेही म्हटले आहे की, यापूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा मोबाइल फोन चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती, मात्र तरुण सापडला नाही म्हणून त्यांच्याकडून गुन्हा कबुल करून घेतला.

वाचा-प्रियकराने Sex Video केला फॉरवर्ड; मित्रांनी केलं धक्कादायक कृत्य

2018मध्ये तरुण जिवंत परतला घरी

याचिकाकर्ता आणि दोन्ही दोषींचा वकील बिस्वाप्रिया कानुंगो यांनी सांगितले की, पायकामल भागातील जीतू दंडसेना डिसेंबर 2016 मध्ये बेपत्ता झाला होता. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आणि खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरूंगात पाठविले. मात्र जीतू दंडसेना 2018 मध्ये कोलकाताहून घरी परतला. तुरुंगातून सुटल्यानंतर अटक करण्यात आलेल्या दोघांनी ओएचआरसीकडे न्याय मागण्याची विनंती केली.

First published:

Tags: Crime news