Home /News /national /

पत्नीकडून नातेवाईकांसमोर पतीच्या नपुंसकतेविषयी चर्चा; उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय  

पत्नीकडून नातेवाईकांसमोर पतीच्या नपुंसकतेविषयी चर्चा; उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय  

हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे,

    बंगळुरू, 16 जून : कर्नाटक उच्च न्यायालयाने (High Court of Karnataka) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात पत्नीने कोणत्याही पुराव्याशिवाय पतीवर नपुंसकताचा आरोप (Husband accused of impotence) लावणं मानसिक छळ केला जात असल्याचं म्हटलं आहे. न्यायालयाने बुधवारी सांगितलं की, अशा प्रकरणात वेगळं होण्यासाठी पती ही याचिका दाखल करू शकतो. न्यायमूर्ती सुनील दत्त यादव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने घटस्फोटाची याचिका फेटाळत धारवाड कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी करणाऱ्या धारवाडमधील एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात हा आदेश दिला. खंडपीठाने याचिकाकर्त्याला पुनर्विवाह होईपर्यंत मासिक 8,000 रुपये भरण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, पत्नीने आरोप केला आहे की तिचा पती लग्नाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नाही आणि शारिरीक संबंध ठेवण्यासही असमर्थ आहे. मात्र, तिने आपल्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे दिलेले या प्रकरणात पतीचं म्हणणं आहे की, तो मेडिकल टेस्ट करण्यासाठीही तयार आहे. यातही पत्नी मेडिकल टेस्टमध्ये आपले आरोप सिद्ध करू शकली नाही. हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या कलम 13 नुसार, नपुंसकता नाराज होण्याचं कारण होऊ शकणार नाही. न्यायालयाने सांगितलं की, या संबंधात खोटे आरोप मानसिक छळाप्रमाणेच आहे आणि पती अशा परिस्थितीत घटस्फोटाची मागणी करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, याचिकाकर्त्याने महिलेसोबत 2013 मध्ये लग्न केलं होतं. त्याने दावा केला आहे की, सुरुवातीला त्यांचं वैवाहिक जीवन व्यवस्थित सुरू होतं. मात्र कालांतराने पत्नीची वागणुकीत बदल आहे. पतीने आरोप केला आहे की, त्याची पत्नी वारंवार नातेवाईकांना माझ्याबद्दल तक्रार करीत होती. मी शरीर संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचं सांगत होती. यामुळे त्याला त्रास होत होता. शेवटी त्याने पत्नीपासून वेगळं होण्याची मागणी केली. यानंतर धारवाड फॅमिला कौर्टाने 17 जून 2015 रोजी घटस्फोटासाठी त्याची याचिका फेटाळली होती. ज्यानंतर पतीने हायकोर्टात धाव घेतली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Divorce, Karnataka, Marriage

    पुढील बातम्या