बनावट मुद्रांक घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू

बनावट मुद्रांक घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू

बंगळुरूमधील रुग्णालयात अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

  • Share this:

26 आॅक्टोबर : बनावट मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य दोषी अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू झालाय. तेलगी गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. आज बंगळुरूमधील रुग्णालयात अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

तेलगी हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवासी आहे. त्याने त्याचा भाऊ अजिम तेलगीला सोबत घेऊन नाशिक येथील प्रिटिंग प्रेसमधील जुनी मशिनरी आणून हा व्यवसाय सुरू केला होता. तेलगीला नोव्हेंबर २००१ मध्ये राजस्थानच्या अजमेरमधून अटक करण्यात आली होती. तेलगीला अटक झाल्यानंतर त्याने अनेक राजकीय नेत्यांची नावं जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. २००७ मध्‍ये त्याला ३० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्‍यात आली होती. तेलगीने बेळगाव, मुंबई आणि पुण्यात कोट्यवधीची बेहिशेबी मालमत्ता जमवली होती.

शिक्षा सुनावल्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात हलवण्यात आलं होतं. पण पत्नी आणि मुलीच्या भेटीसाठी त्याने बंगळुरुमधील कारागृहात पाठावावं अशी विनंती केली होती. त्यानंतर त्याला बंगळुरूच्या परप्पन अग्रहार कारागृहात ठेवलं होतं.

गेल्या काही दिवसांपूर्वी तेलगीची प्रकृती खालावल्यामुळे त्याला बंगळुरुच्या व्हिक्टोरिया रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अवयव निकामी झाल्यामुळे आज त्याचा मृत्यू झाला.

First published: October 26, 2017, 6:39 PM IST

ताज्या बातम्या