ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी इम्रान खान यांना भेटले? हे फोटो शेअर करण्यापूर्वी जरा विचार करा

राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी इम्रान खान यांना भेटण्यासाठी वाट बघत बसले आहेत, असा फोटो तुम्हाला कुणी फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा अन्य सोशल मीडियावर दिसला तर शेअर करण्यापूर्वी विचार करा.

  • Share this:

ममता आणि राहुल यांच्या फोटोभोवती लाल गोल करून ते ठळकपणे दाखवणारी एक इमेज सोशल मीडियावर फिरत आहे. हा फोटो 7 एप्रिलपासून फेसबुकवर सुमारे 5000 वेळा शेअर झाला आहे.

प्रत्यक्षात रिव्हर्स इमेज सर्च या पद्धतीचा वापर करून या फोटोची सत्यता पडताळली असता हा फोटो बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे हा फोटो पुढे शेअर करू नका.

हा तो मूळ फोटो. राहुल गांधी आणि मतता बॅनर्जी यांचा हा फोटो शोधण्यासाठी इंटरनेट सर्च टूलचा वापर केला तेव्हा लक्षात आलं की तो फेक फोटो आहे. मूळ फोटोत फेरफार करून हा फोटो बनवण्यात आला आहे. इम्रान खान आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख यांच्या बैठकीचा हा मूळ फोटो 4 एप्रिलला सोशल मीडियावर प्रथम पोस्ट झाल्याचं दिसतं. या मूळ फोटोत पाकिस्तान लष्करप्रमुख जनरल जावेद बाजवा आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याखेरीज कुणीही नाही.

बनावट फोटो तयार करणाऱ्यांनी इम्रान खान यांच्या निवासस्थानी राहुल, ममता यांच्याखेरीज भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले खासदार शत्रुघ्न सिन्हासुद्धा दाखवले आहेत. एवढंच नाही तर खिडकीबाहेर नमाज पढताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसुद्धा दिसतील.

गुगलप्रमाणे Yandex या सर्च इंजिनवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आणखी काही सारखे दिसणारे फोटो दिसले. यात मागच्या रिकाम्या खुर्च्याच दिसत आहेत.

या फेक फोटोबरोबर 7 एप्रिलला कानडी भाषेतला मजकूरसुद्धा शेअर झाला होता. तुम्ही काँग्रेसला मत दिलंत तर ते पाकिस्तानला देत आहात. फोटो पाहा पाकिस्तानचे गुलाम कोपऱ्यात बसलेले दिसतील.

मूळ फोटोत फेरफार करून कुणीतरी हा फेक फोटो तयार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 06:05 PM IST

ताज्या बातम्या