पासपोर्ट बनवणाऱ्या या बनावट वेबसाइट्सपासून सावधान! अकाउंटमधून काढून घेतात पैसे

पासपोर्ट बनवणाऱ्या या बनावट वेबसाइट्सपासून सावधान! अकाउंटमधून काढून घेतात पैसे

पासपोर्ट बनवणाऱ्या बनावट वेबसाइट्सपासून सावध राहण्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. या वेबसाइट्सची लिंक तुमचा फोन किंवा कॉम्प्युटरवर उघडू नये, अशाही सूचना आहेत. कारण या बनावट वेबसाइट्स चालवणारे लोक काही सेकंदांत तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतात.

  • Share this:

मुंबई, 9 जुलै : तुम्हाला जर पासपोर्ट बनवायचा असेल तर पासपोर्ट विभागाची www.passportindia.gov.in ही अधिकृत वेबसाइट आहे. या वेबसाइटवर अर्ज केला तर तुम्हाला खराखुरा म्हणजेच अधिकृत पासपोर्ट मिळू शकतो. पण सध्या काही बनावट वेबसाइट्सही तुम्हाला पासपोर्ट मिळवून देण्याचा दावा करत आहेत.

अशा वेबसाइट्सपासून सावध राहण्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. या वेबसाइट्सची नावंही परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहेत. या वेबसाइट्सवर तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती तसंच बँक खात्याचा तपशील शेअर करू नका, असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

या आहेत पासपोर्ट मिळवून देणाऱ्या बनावट वेबसाइट्स. या वेबसाइट्सवर तुमची माहिती शेअर करू नका. तुम्ही असं केलंत तर फसवले जाण्याचा धोका आहे.

- www.indiapassport.org

- www.indiapassport.org

- www.passport-seva.in

- www.online-passportindia.com

- www.passportindiaportal.in

- www.passport-india.in

- www.applypassport.org

पासपोर्ट बनवण्याच्या नावाखाली या वेबसाइट्स ठरलेल्या फी पेक्षा जास्त पैसे उकळतात. पण पासपोर्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर कोणत्याही प्रकारचं जादा शुल्क आकारलं जात नाही.

या बनावट वेबसाइट्सवर पासपोर्टसाठी अपॉइंटमेंटही दिली जाते. या वेबसाइट्सचं डोमेन नेम.org, in किंवा.com या रूपात आहे. याच पत्त्यांशी मिळत्याजुळत्या असलेल्या काही वेबसाइट्सची नावं समोर आली आहेत. या वेबसाइट्सची लिंक तुमचा फोन किंवा कॉम्प्युटरवर उघडू नये, अशाही सूचना आहेत. कारण या बनावट वेबसाइट्स चालवणारे लोक काही सेकंदात तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतात.

VIDEO : हा रोबो तुमच्यासाठी घरी जेवण बनवून ठेवू शकतो!

पासपोर्टसाठीची अधिकृत फी

ऑनलाइन पासपोर्टसाठी अधिकृत फी 1500 रुपये आहे.

तात्काळ पासपोर्टची फी 3 हजार 500 रुपये आहे.

15 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी पासपोर्ट काढायचा असेल तर 1 हजार रुपये फी आहे.

15 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी 1500 रुपये फी भरून 10 वर्षांच्या मुदतीचा पासपोर्ट बनवता येतो.

पासपोर्ट विभागाची ही अधिकृत फी आहे. त्यापेक्षा जास्त फी कुणी आकारत असेल तर ती वेबसाइट बनावट आहे, अशा वेबसाइट्सपासून सावध राहा, अशा परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना आहेत.

===========================================================================================

VIDEO : 'जंग का वक्त आ गया है', असा आहे सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर!

First published: July 9, 2019, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading