बेळगावात सापडल्या 7 कोटींच्या बनावट नोटा

याप्रकरणात 500 आणि 2000च्या बनावट नोटा बेळगावातील विश्वेशवरैया नगरातून जप्त करण्यात आल्या आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2018 07:35 PM IST

बेळगावात सापडल्या 7 कोटींच्या बनावट नोटा

18 एप्रिल: एकीकडे देशभरात नोटांचा खडखडाट चालला असताना दुसरीकडे कर्नाटक मात्र बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय.  कर्नाटकातील बेळगावात तब्बल सात कोटीच्या बनावट नोटा सापडल्या आहेत.

याप्रकरणात  500 आणि 2000च्या बनावट नोटा बेळगावातील विश्वेशवरैया नगरातून जप्त करण्यात आल्या आहेत. काल रात्री या ठिकणी पोलीसांची   धाड पडली होती. या  नोटा मंजुनाथ कोर्टी या माणसाच्या घरात ठेवल्या होत्या.याप्रकरणी   अजित निदोणी नावाच्या एका माणसाला पोलिसांनी अटक केली आहे. तसंच याप्रकरणी पोलीस  पुढील तपास करत आहेत.

तर दुसरीकडे  आज मुंबई वगळता महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरातल्या एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळतोय. पुणे, नाशिक, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यात नोटांचा तुटवडा निर्माण झालाय. पुण्यामधले बहुतांश एटीएम कॅशलेस झालेत. रोख रक्कम काढण्यासाठी पुणेकरांनी सकाळपासून एटीएम सेंटर गाठायला सुरूवात केली. मात्र अनेक एटीएम सेंटरबाहेर नो कॅशचे बोर्ड लागलेला पाहायला मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...