मराठी बातम्या /बातम्या /देश /

NonVeg खवय्यांची हौस भागवणारे नकली मांस, जिभेचे चोचले पुरवण्यासह आरोग्याची काळजीही

NonVeg खवय्यांची हौस भागवणारे नकली मांस, जिभेचे चोचले पुरवण्यासह आरोग्याची काळजीही

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

जगभरामध्ये वनस्पतींवर आधारित प्रथिने (Protein) बरीच लोकप्रिय झाली आहेत. 2030 पर्यंत ऑस्ट्रेलियात याचा व्यवसाय तीन अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. नकली मांसाहार आरोग्यासह पर्यावरण रक्षणासाठी उत्तम असल्यानं याची ख्यातही सगळीकडं पसरत आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : अनेकांना शाकाहारापेक्षा (Vegetarian) मांसाहार (Non Vegetarian Food) जास्त आवडतो. चिकन, मासे, सीफूड पौष्टिक असल्यानं याकडंही ओढा जास्त असतो. अनेक मांसाहारप्रेमी तर श्रावणातही त्यांच्या जीभेवर नियंत्रण मिळवू शकत नाहीत. प्रमाणापेक्षा अधिक मासांहार केल्याने शरीरावर त्याचे अपायकारक परिणाम पाहायला मिळतात. त्यामुळे अनेकदा डॉक्टरही मासांहारावर नियंत्रण मिळवण्याचा सल्ला देतात. परंतु, नॉन व्हेजप्रेमींना वनस्पतींवर आधारित नकली मांसाहाराचा पर्याय उपलब्ध झाला आहे. परिणामी चिकन, मटन व इतर प्राण्यांच्या मांसापासून तयार झालेल्या उत्पादनांकडं लोक कमी वळत आहेत. ‘झी न्यूज हिंदी’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. जगभरामध्ये वनस्पतींवर आधारित प्रथिने (Protein) बरीच लोकप्रिय झाली आहेत. 2030 पर्यंत ऑस्ट्रेलियात याचा व्यवसाय तीन अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. नकली मांसाहार आरोग्यासह पर्यावरण रक्षणासाठी उत्तम असल्यानं याची ख्यातही सगळीकडं पसरत आहे. ऑस्ट्रेलियाच्या सुपर मार्केटमध्ये नकली मांसाची 130 पेक्षा अधिक उत्पादनं आहेत. या सर्वांचा लेखाजोखा (Audit) करण्यात आला. त्यात या उत्पादनात सरासरी कॅलरी आणि चरबीचे प्रमाण कमी होतं. मांसाहार उत्पादनाच्या तुलनेत नकली मांसामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबरही अधिक प्रमाणात आढळलं. परंतु, वनस्पती आधारित सर्व उत्पादनं एकसमान पद्धतीनं बनवली जात नाहीत. अमेरिकेतील 36 ज्येष्ठ नागरिकांची आठ आठवडे चाचणी घेण्यात आली. यात नकली मांसामुळे कालेस्टेरॉलचा (Cholesterol) स्तर, वजन आणि हृदयरोगाचा धोका असलेल्या घटकांत सुधारणा पाहायला मिळाली. वास्तविक पाहता हे संशोधन सध्या प्राथमिक अवस्थेत असले तरी नकली माणसाचे फायदे काही प्रमाणात समोर येत आहेत. पर्यावरणासाठी उत्तम नकली मांस पर्यावरणाच्या रक्षणासाठी उत्तम मानले जाते. यूएस बियोंड मीट बर्गर आणि पारंपरिक बीफ पेटी यांची तुलना केली तर मीट बर्गर तयार करण्यासाठी 99 टक्के कमी पाणी वापरावं लागतं. 93 टक्के जमिनीचा उपयोग कमी केला जातो. ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाचं प्रमाणही 90 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने मीट बर्गर हा उपयुक्त आहे. लँन्सेट प्लॅनेटरी हेल्थमध्ये या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, उत्पादन खाल्ल्याचा परिणाम शाकाहारी उत्पादन खाल्ल्याचा परिणाम आर्थिक गोष्टींवरही होत असल्याचेही दिसून आलं आहे या अभ्यासात असं लक्षात आलं आहे की बीफ आणि वनस्पतीजन्य पदार्थांच्या सेवनाची तुलना केली तर अमेरिकी खाद्य उत्पादनात कार्बनचा परिणाम हा 13.5% पर्यंत कमी झाला आहे तसंच नकली नॉनव्हेज खाल्ल्यामुळे जनावरांचे प्राणही वाचत आहेत. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा नकली मांस काय असतं? खरं तर नैसर्गिक मांसाला पर्याय म्हणून शाकाहारी पदार्थांपासून तयार केलेलं हे नकली मांस हे मांस या कॅटेगरीत मोडत नाही. खरं तर नकली मांसाचे दोन प्रकार आहेत ज्यामध्ये वनस्पती आधारित प्रोटिन असलेले मांस आणि कोशिकांवर आधारित प्रोटिन असलेलं मांस. हे नकली मांस नसून ते वनस्पती आणि कोशिका म्हणजे स्नायूंवर आधारित मांस आहे, असं मांस विक्रेत्यांचं म्हणणं आहे. ते आता जगभर उपलब्ध होत आहे. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर शाकाहार करणाऱ्या अनेकांना मांसाहार करण्याची इच्छा असते, पण काही कारणांमुळे ते तो टाळतात आणि मांसाहार करणाऱ्यांच्या मनात पशु हत्येची सल असतेच पण त्यांची सवय सुटत नाही. त्यामुळे या दोन्ही गटांतील व्यक्तींसाठी हा नकली मांसाचा पर्याय खूप उपयुक्त ठरू शकतो.
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या