नोकरीचं अमिष दाखवून 100 कोटींची फसवणूक, 'महाठग' पोलिसांच्या ताब्यात!

नोकरीचं अमिष दाखवून 100 कोटींची फसवणूक, 'महाठग' पोलिसांच्या ताब्यात!

घोटाळ्याची व्याप्ती ही फक्त भारतापूर्तीच नाही तर जगभर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

  • Share this:

हैदराबाद 25 जानेवारी : नोकरीची जाहीरात दिसली की तरुण त्यावर तुटून पडतात. काही पदांसाठी लाखोंनी अर्ज येण्याच्या घटनाही आता नव्या नाहीत. मात्र हैदराबादच्या एका महाठगाने नोकरी देतो असं सांगून लाखो तरुणांना फसवल्याची घटना उघड झालीय. हैदराबाद पोलिसांनी हे बनावट रॅकेट उघडकीस आणलं असून त्यांनी तब्बल 100 कोटींची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. जगभर या घोटाळ्याची व्याप्ती असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.


हैदराबात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या महाठगाचं नावं आहे अजय कोल्ला. पोलिस त्याची कसून चौकशी करत असून अनेक खळबळजनक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. या रॅकेटमध्ये अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


अशी होती मोडस् ऑपरेंडी

अजय कोल्लाने 'विस्डम जॉब्स्' हे नोकरी देणारं पोर्टल काढलं होतं. अजय हा या कंपनीचा CEO असल्याचं सांगतो. विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी देतो असं तो तरुणांना आश्वासन देत होता. त्यासाठी या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागत होतं. त्यासाठीही पैसेही मोजावे लागत असे.


या पोर्टलवर 1 कोटींपेक्षा जास्त तरुणांनी आपलं नाव रजिस्टर केलं होतं. त्यामुळं त्याच्याकडे मोठा डेटाही जमा झाला होता. आखातात नोकरी मिळवून देतो असं सांगूनही त्याने कोट्यवधी रुपये उकळल्याचं उघड झालं. कॉर्पोरेट आणि इतर कंपन्यांमध्ये नोकरी देतो असं सांगून तो तरुणांकडून पैसे घ्यायचा आणि नंतर त्यांना आज उद्या करत अनेक वर्ष फिरवायचा.


जगभर व्याप्ती


शेवटी तरुण कंटाळून त्याचा नाद सोडून द्यायचे. असं करत त्याने लाखो तरुणांना गंडा घातला अशी माहिती पोलिसांनी दिलीय. त्याच्याकडे असलेला महत्त्वाचे डेटा त्याने विकला असल्याचीही भीती पोलिसांनी व्यक्त केलीय.

हे रॅकेट फक्त भारतापुरतच मर्यादीत नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचे धागेदोरे असल्याचा दावा पोलिसांनी केलाय.


याची व्याप्ती मोठी असल्याने हैदराबाद पोलिसांनी तपासासाठी 10 जणांचं विशेष पथक स्थापन केलं असून त्यात सायबर तज्ज्ञांचाही समावेश आहे.


पडलेल्या फोटोग्राफरला उचलण्यासाठी राहुल गांधी धावले, काँग्रेसकडून VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2019 03:39 PM IST

ताज्या बातम्या