01 एप्रिल : तुम्ही दुकानातून अंडी विकत घेतली आणि घरी गेल्यावर जर ती अंडी प्लॅस्टिकची निघाली तर...दचकू नका असा प्रकार कोलकात्यामध्ये घडलाय.
कोलकात्यामध्ये एका दुकानदाराने चक्क प्लॅस्टिकची अंडी विक्रीचा गोरखधंदा सुरू केला होता. मोहम्मद शमीम अंसारी असं या महाभागाचं नाव आहे. अनिता कुमार या महिलेनं काल (शुक्रवारी) अंसारीकडून अंडी विकत घेतली. घरी गेल्यावर ऑम्लेट बनवायला घेतलं. तेव्हा त्यांना अंड्याचा पिवळा भाग नैसर्गिक वाटला नाही. त्यांना संशय आला. त्यांनी काडेपेटी त्याच्याजवळ नेली. तर त्या पिवळ्या द्रवानं चक्क पेट घेतला. तेव्हा त्यांचा संशय पक्का झाला की अंडी नकली आहे. अंसारीनंही यांची कबुली दिलीय. अंसारीने ही नकली अंडी आणली कुठून, याचा तपास कोलकाता पालिका आणि पोलीस करत आहे.