मराठी बातम्या /बातम्या /देश /

लॅपटॉप-कॉम्प्युटरमध्ये व्हायरस टाकून 170 कोटींची फसवणूक, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

लॅपटॉप-कॉम्प्युटरमध्ये व्हायरस टाकून 170 कोटींची फसवणूक, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या नावाने कंपन्या स्थापन केल्या होत्या. कॉल सेंटरवरून परदेशी नागरिकांशी संपर्क साधून संगणक-लॅपटॉप टाकून व्हायरस फिक्स करण्याची फसवणूक केली जात होती.

    नोएडा, 16 जुलै : दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथे विशेष तपास पथकाने (STF) बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. तसेच याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. परदेशी लोकांच्या लॅपटॉप-कॉम्प्युटरमध्ये व्हायरस फिक्स करून देण्याच्या नावाखाली या लोकांनी 170 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - यूपी एसटीएफचे प्रभारी वरिष्ठ पोलीस अधीक्षक विशाल विक्रम सिंह यांनी सांगितले की, शुक्रवारी बी-36, सेक्टर-59, नोएडातील कथित कॉल सेंटरवर छापा टाकून टोळीच्या प्रमुखासह 10 जणांना अटक केली. आरोपींनी अमेरिकेपासून ते दुबईपर्यंत शेकडो लोकांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे, करण मोहन (सेक्टर 44), विनोद सिंग (बेगमगंज गोंडा), ध्रुव नारंग (सेक्टर 92), मयंक गोगिया (सेक्टर 49), अक्षय मलिक (सेक्टर 15 ए), दीपक सिंग (गढी चौखंडी), आहुजा पोडवाल (गौर), अक्षय शर्मा, जयंत सिंग आणि मुकुल रावत (तिन्ही रा. दिल्ली), अशी आहेत. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सिंग म्हणाले तपासादरम्यान असे समोर आले आहे की, आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या नावाने कंपन्या स्थापन केल्या होत्या. कॉल सेंटरवरून परदेशी नागरिकांशी संपर्क साधून संगणक-लॅपटॉप टाकून व्हायरस फिक्स करण्याची फसवणूक केली जात होती. तांत्रिक मदतीच्या नावाखाली आरोपी लॅपटॉप-कॉम्प्युटर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या साह्याने हॅक करून परदेशी नागरिकांच्या ऑनलाईन खात्याची किंवा क्रेडिट कार्डची माहिती चोरून भाड्याने घेतलेल्या परदेशी खात्यांमध्ये पैसे वर्ग करायचे. हेही वाचा - स्वतःच्या घरात फोनवर बोलत होती महिला, पोलिसांनी ठोकला तब्बल 27 हजारांचा दंड, पण कारण काय? तसेच आरोपींनी सांगितले की त्यांना हवालाद्वारे भारतीय चलनात रोख मिळत असे. भाड्याच्या खात्यात पैसे डॉलरमध्ये जायचे. नंतर भाड्याने खाते प्रदाता कमिशन कापून भारतात पैसे हस्तांतरित करायचे. बनावट कॉल सेंटरचे जाळे जगातील अनेक देशांमध्ये आहे. आरोपींनी अमेरिका, कॅनडा, लेबनॉन, ऑस्ट्रेलिया, दुबई येथून अनेक पाश्चिमात्य देशांतील लोकांची फसवणूक केली आहे. नोएडाच्या कॉल सेंटरमध्ये पन्नासहून अधिक लोक रोज काम करत होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Financial fraud, Online fraud

    पुढील बातम्या