मुंबई, 30 जानेवारी : भविष्यातल्या संभाव्य घटनांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. यासाठी अनेक जण ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मार्गदर्शन घेतात; मात्र काही वेळा बनावट ज्योतिष्यांमुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. चीनमध्ये अशाच प्रकारचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका चिनी तरुणीने तिचा बॉयफ्रेंड परत तिच्याकडे यावा, यासाठी कथितपणे काळ्या जादूचा वापर केला. नकली ज्योतिषाने विविध उपाय सांगून या तरुणीला 13,000 युआन म्हणजे सुमारे 1.56 लाख रुपयांना गंडा घातला. यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊ या.
चीनमधल्या शांघाय इथल्या एका तरुणीने तिचा बॉयफ्रेंड तिच्याकडे परत यावा, यासाठी काळ्या जादूची मदत घेतली; मात्र यामुळे ती नकली ज्योतिष्याच्या जाळ्यात अडकली. या ज्योतिष्याने तिला 13,000 युआन म्हणजेच सुमारे 1.56 लाख रुपयांचा गंडा घातला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांना अटक केली आहे. हे आरोपी सिंगल व्यक्तींना लक्ष्य करत असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. या व्यक्ती अविवाहित तरुण-तरुणींना प्रेमाशी निगडित मंत्र आणि अनुष्ठान करण्याच्या पद्धती सांगतात. त्यांनी फसवणूक करून 8,00,000 युआन म्हणजेच 96 लाख रुपये जमवले होते.
हेही वाचा - 'भोंदू बागेश्वर बाबा शिंदेशाही पगडी..' तुकाराम महाराजांवरुन संभाजी ब्रिग्रेड आक्रमक; भाजपलाही लगावला टोला
चिनी व्यक्ती भविष्य जाणून घेण्यासाठी अशा प्रकारच्या सर्व्हिसचा वापर करतात. 2021मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, चीनमध्ये 30 वर्ष वयोगटातले सुमारे 80 टक्के नागरिक या सुविधेचा लाभ घेतात. कथितपणे भविष्य सांगणाऱ्या चीनमधल्या एका अॅपने केवल एका वर्षात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'आम्ही अंधश्रद्धाळू नाही; पण नोकरी, डेटिंग, शिक्षणाचा ताण कमी करण्यासाठी भविष्य जाणून घेण्यास उत्सुक असतो', असं चिनी नागरिक सांगतात.
दरम्यान, नकली ज्योतिष्याच्या जाळ्यात अडकून फसलेल्या तरुणीचं नाव मायी असं आहे. टिकटॉकवर पोस्ट केलेल्या राशिभविष्याच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून ती या जाळ्यात अडकली. मायीने सुरुवातीला तिचं भविष्य जाणून घेण्यासाठी 599 युआन म्हणजेच सुमारे सात हजार रुपये दिले. तुझा बॉयफ्रेंड तुझ्याकडे परत येईल, असं या ज्योतिष्याने सांगितल्यावर मायी खुश झाली. नंतर यासाठी जादूशी निगडित काही अनुष्ठानं करावी लागतील आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतील, असं नकली ज्योतिष्याने सांगितलं. त्यानंतर तिला दोन व्हिडिओ पाठवण्यात आले. यात दोन मेणबत्त्या जळताना दिसत होत्या. यापैकी पहिल्या मेणबत्तीचा अर्थ नवीन नातं जोडलं गेल्यानं बॉयफ्रेंडचं नशीब संपुष्टात येईल आणि दुसऱ्या मेणबत्तीचा अर्थ त्याचं गुडलक तुला मिळेल, असं सांगण्यात आलं.
हेही वाचा - कोट्यवधींच्या संपत्तीचा त्याग, वयाच्या 8व्या वर्षी देवांशी बनली जैन भिक्षु; असं असेल पुढली जीवन
यानंतर एक आठवड्यापर्यंत चालणारा काळ्या जादूचा खेळ सुरू झाला. या तरुणीला आरोपींनी सांगितलं, की आम्ही भुतांकडून अशी शक्ती आणू की ज्यामुळे तुझं नातं पूर्वीसारखं होईल आणि एक्स बॉयफ्रेंड तुझ्याशिवाय इतर कोणाचाही विचार करणार नाही. यासाठी मायीला एक यादी देण्यात आली. त्यात तावीजांचे दर लिहिलेले होते. ते हजारांच्या घरात होते. या व्यक्ती अशा व्यक्तींना लक्ष्य बनवतात, ज्या प्रेमात नशीब आजमावू इच्छितात.
जेव्हा मायीने तिची कहाणी सोशल मीडियातून शेअर केली तेव्हा अनेकांनी तिच्यावर कडाडून टिका केली. 'प्रेमाचा आजार कोणतीही काळी जादू बरा करू शकत नाही', असं एका युझरने म्हटलं आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटलं, 'की मला तिच्या एक्स -बॉयफ्रेंडचा हेवा वाटतो. कारण हे दाजू वगैरे काहीच उपयुक्त ठरलं नाही'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope