फेसबुक नव्हे 'फेकबुक'; बनावट खात्यांची संख्या ऐकून झोप उडेल

फेसबुक नव्हे 'फेकबुक'; बनावट खात्यांची संख्या ऐकून झोप उडेल

सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेले फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या इतकी अधिक आहे की लोकसंख्येचा विचार करता तो तिसरा मोठा देश होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेले फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या इतकी अधिक आहे की लोकसंख्येचा विचार करता तो तिसरा मोठा देश होईल. फेसबुक वापरणाऱ्यांपैकी काही जण नियमीत त्याचा वापर करतात. कंपनीच्या मते जे लोक महिन्याला किमान एकदा तरी फेसबुक वापरतात त्यांना मंथली अॅक्टिव्ह युझर्स (MAU)असे म्हणतात. पण जर MAUचा विचार केला तर यापैकी 25 कोटी युझर्स हे बनावट युझर्स असल्याचे खुद्द फेसबुकने सांगितले आहे.

हे देखील वाचा: प्रियांका गांधीबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? 16 व्या वर्षीच...

फेसबुकने 2018च्या वार्षिक रिपोर्टच्या चौथ्या तिमाही अहवालात 11 टक्के युझर्स बनावट असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे 2015मध्ये ही संख्या केवळ 5 टक्के होती. डिसेंबर 2015मध्ये MAUची संख्या 1.59 अब्ज होती जी 2018मध्ये 2.23 अब्ज झाली. या अहवालात असे म्हटले आहे की, काही युझर्स त्यांच्या मुख्य अकाउंट शिवाय अन्य अकाउंट तयार करतात. तर काही जण चुकीच्या गोष्टी करण्यासाठी अकाउंट तयार करतात.

बनावट अकाउंट असलेल्यामध्ये असे लोक आहेत जे स्वत:चे खरे अकाउंट असताना देखील दुसरे फेक अकाउंट सुरु करतात. तर काही जण थेट बनावट अकाऊंट सुरु करतात असे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकच्या मते जगभरात अॅक्टिव्ह युझर्सची संख्या 9 टक्क्यांनी वाढून ती 2018मध्ये 1.52 अब्जवर पोहचली आहे. ही संख्या 1.40 अब्ज होती. अॅक्टीव्ह युझर्सची संख्या भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या देशात सर्वाधिक आहे.

Special Report : मोदी विरुद्ध ममता की ममता विरुद्ध राहुल?

First published: February 5, 2019, 12:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading