खरं की खोटं? व्हायरल झालेला हा फोटो विक्रम लँडरचा आहे का?

विक्रम लँडरचा ठावठिकाणा कळल्यानंतर काही लोकांनी अतिउत्साहात 'नासा' चा जुना फोटो शेअर केला आणि हा फोटो विक्रम लँडरचाच आहे, अशी थापही मारली. एवढंच नव्हे तर हा फोटो इस्रोच्या प्रमुखांनीच प्रसिद्ध केला आहे, असंही लिहिलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 05:21 PM IST

खरं की खोटं? व्हायरल झालेला हा फोटो विक्रम लँडरचा आहे का?

मुंबई, 9 सप्टेंबर : चांद्रयान -2 मधला विक्रम लँडर चंद्रावर पोहोचल्याची खबर मिळाली आणि सगळ्यांनाच एक दिलासा मिळाला. चांद्रयान - 2 च्या ऑर्बिटरने विक्रम लँडरची इमेज मिळल्याचं इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितलं. चांद्रयानातल्या या लँडरचं हार्ड लँडिंग झालं असेल, असंही ते म्हणाले.

इस्रोने हे जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरल्याचा दावा या फोटोत करण्यात आला आहे. पण व्हायरल झालेला हा फोटो खोटा आहे, असं समोर आलं आहे.

तो फोटो 'अपोलो 16' चा

विक्रम लँडरचा ठावठिकाणा कळल्यानंतर काही लोकांनी अतिउत्साहात 'नासा' चा जुना फोटो शेअर केला आणि हा फोटो विक्रम लँडरचाच आहे, अशी थापही मारली. एवढंच नव्हे तर हा फोटो इस्रोच्या प्रमुखांनीच प्रसिद्ध केला आहे, असंही लिहिलं. त्यानंतर हे फोटो वेगाने ट्रेंड झाले.

हे फोटो गुगलवर सर्च केले तेव्हा कळलं, ते अपोलो 16 च्या लँडिंग साइटचे फोटो आहेत. इस्रोच्या एका वरिष्ठ वैज्ञानिकांच्या मते, विक्रम लँडरचा फोटो असल्याचा दावा करणाऱ्या या सगळ्या पोस्ट खोट्या आहेत.

Loading...

चांद्रयान 2 : ISROसाठी पुढील 288 तास निर्णायक!

ऑर्बिटरने काढलेला विक्रम लँडरचा फोटो 3 दिवसांनंतरच मिळणं शक्य होईल. ऑर्बिटरला एका पॉइंटला येण्यासाठी 3 दिवस लागतात. त्यामुळेच हा फोटो ऑर्बिटरने काढलेला असण्याची शक्यताच नाही.तुमच्याकडेही सोशल मीडियाच्या माध्यमातून असे फोटो आले तर ते फॉरवर्ड किंवा शेअर करू नका. इस्रोच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर असलेली माहितीच ग्राह्य धरता येऊ शकते, असं आवाहन वैज्ञानिकांनी केलं आहे.

===============================================================================

VIDEO : पवारांना सांगा..,चंद्रकांत पाटलांचा बारामतीच्या सभेत टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...