S M L

फैजाबाद नव्हे अयोध्या!, योगी सरकाराचा मोठा निर्णय

"रामाचे नावाने अयोध्येत विमानतळ आणि मेडिकल कॉलेज बनवणार आहोत. अयोध्या आपली आन बान शान आहे"

Updated On: Nov 6, 2018 06:05 PM IST

फैजाबाद नव्हे अयोध्या!, योगी सरकाराचा मोठा निर्णय

उत्तरप्रदेश, 06 नोव्हेंबर : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नामकरण करण्याचा धडाका लावला आहे. आता त्यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या करण्याची घोषणा केली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या शहराच्या नामकरणाची घोषणा केली.




अयोध्येत भव्य दिपोत्सवाचं आयोजन करण्यात आले  आहे. यासाठी शरयू नदीकाठी 3 लाख दिवे प्रज्वलीत करण्यात येणार आहे. या  कार्यक्रमासाठी दक्षिण कोरियाच्या प्रथम महिला किम जुंग सुक उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन करत असताना योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद शहराचे नाव बदलण्याची घोषणा केली.



Loading...




रामाचे नावाने अयोध्येत विमानतळ आणि  मेडिकल कॉलेज बनवणार आहोत. अयोध्या आपली आन बान शान आहे. आज जगभरात दिवाळी साजरी होत आहे याचे मूळ हे अयोध्येत  आहे. त्यामुळे अयोध्येबाबत तडजोड केली जाणार नाही असं योगी आदित्यनाथ म्हणाले.





गरिब लोकांचे प्रश्न सोडवणे हीच रामराज्याची संकल्पना आहे. अयोध्येमध्ये आम्ही  रस्ते चांगले केले,वीज पोहोचवली. केवळ फक्त घोषणामध्ये राम राहता कामा नये असंही आदित्यनाथ म्हणाले.


योदी आदित्यनाथ यांनी सोमवारीच राजधानी लखनऊ येथील इकाना स्टेडियमचे नाव बदलून टाकण्याचा निर्णय घेतला. इकाना स्टेडियमच्या नामकरणाला राज्यपालांनीही मंजुरी दिली.


योगी सरकारने इकाना स्टेडियमचे नाव बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असं नामकरण केलं आहे. आता इकाना स्टेडियमला भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाणार आहे.


विशेष म्हणजे, लखनऊमध्ये २४ वर्षांनंतर इथं इंटरनॅशनल क्रिकेट सामना रंगणार आहे. राजधानी इकाना स्टेडियममध्ये ६ नोव्हेंबरला भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान दुसरा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. आता हा सामना अधिकृतरित्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


===============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2018 05:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close