मंदिर होते आणि राहणारच-योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत रामाची मूर्ती स्थापन करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2018 06:39 PM IST

मंदिर होते आणि राहणारच-योगी आदित्यनाथ

07 नोव्हेंबर : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्यामध्ये रामाची भव्य मूर्ती उभारण्याची घोषणा केली आहे, जी अयोध्येची ओळख असणार आहे. त्यांनी हा निर्णय फैजाबादचे नाव बदलून अयोध्या करण्याच्या दुसऱ्या दिवशी घेतला. योगी आदित्यनाथ हे हनुमानगढी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी दोन ठिकाणी राम मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती दिली.


रामाची भव्य मूर्ती स्थापन करण्याचा आम्ही विचार करतोय. यावर पुढे सर्वांशी चर्चाही केली जाईल. हा प्रकल्प पुढे सरकत आहे. वास्तूविशारद यांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.Loading...

अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराच्या मागणीवर योगी आदित्यनाथ म्हणतात, "तुम्हाला माहिती असेलच की अयोध्येत पहिल्यापासून एक मंदिर आहे. मंदिर होतं आणि राहणारच. सर्व पर्याय मोकळे आहे. यावर तोडगा हा कायदा आणि संविधानानुसारच काढला जाईल."


योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत रामाची मूर्ती स्थापन करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रामाची भव्य मूर्ती स्थापन करण्यासाठी जागेची उपलब्धतेनुसार चर्चा केली जाणार आहे. एक मूर्ती पूजा करण्यासाठी ही मंदिरात असणार आहे आणि दर्शनिय मूर्ती बाहेर असणार आहे तीच अयोध्येची ओळख असणार आहे असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.


योगी आदित्यनाथ पुढे म्हणतात, "आम्ही यासाठी सर्व व्यवस्था करणार आहोत. ज्यामुळे लोकांच्या आस्थेचा सन्मान होईल आणि अयोध्येला ओळख मिळेल."


राममंदिराच्या जागेबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, तुम्हाला माहिती आहे अयोध्येत राम मंदिर आहे, होते आणि राहणार असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.


==========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2018 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...