मराठी बातम्या /बातम्या /देश /

Fact Check : तुमच्या मुलीच्या लग्नासाठी मोदी सरकारकडून 40,000 रुपयांची मदत?

Fact Check : तुमच्या मुलीच्या लग्नासाठी मोदी सरकारकडून 40,000 रुपयांची मदत?

प्रेयसीचे आई-वडील नाहीत. त्यामुळे लग्नात प्रेयसीला गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देण्याची प्रियकराची इच्छा होती. मात्र त्याच्याकडेही पैसे नसल्याने त्याने थेट सोन्याचं दुकान लुटलं.

प्रेयसीचे आई-वडील नाहीत. त्यामुळे लग्नात प्रेयसीला गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देण्याची प्रियकराची इच्छा होती. मात्र त्याच्याकडेही पैसे नसल्याने त्याने थेट सोन्याचं दुकान लुटलं.

मोदी सरकारने प्रधानमंत्री कन्या विवाह योजना सुरू केल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : सोशल मीडियावर एक बातमी जलद गतीने व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार प्रधानमंत्री कन्या विवाह योजनेअंतर्गत मुलींना त्यांच्या लग्नासाठी 40,000 रुपये देत आहे. मात्र जेव्हा ही बातमी तपासण्यात आली तेव्हा हा दावा चुकीचा असल्याची बाब समोर आली आहे. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) यांनी ट्विट जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारे कोणाच्याही खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाणार नाहीत. केंद्र सरकारनेही सांगितले की सध्या त्यांची अशी कोणतीही योजना नाही.

खोटा आहे दावा

पीआयपी फॅक्ट चेकच्या टीमने सांगितले की हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारद्वारा प्रधानमंत्री कन्या विवाह योजनेअंतर्गत पैसे दिले जात नाहीत.

काय आहे सत्य?

व्हायरल होत असलेली बातमी पूर्णपणे खोटी आहे. केंद्र सरकार द्वारा अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही. भारत सरकारच्या या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (पीआईबी) यांनी व्हायरल बातमी फेटाळली असून अशा प्रकारची योजना सुरू केली नसल्याचे सांगितले आहे.

सरकारकडून असा निर्णय घेण्यात आलेला नाही

कोरोना काळात देशभरात जी परिस्थिती आहे, अशात फेक बातमी जलद व्हायरल होतात. जर तुम्हाला असा कोणताही संदेश येतो तर आधी तो पीआयबीकडून फॅक्ट चेक करुन घ्या. यासाठी https://factcheck.pib.gov.in/ अथवा व्हाट्सअॅप नंबर +918799711259 वा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. ही माहिती पीआयबीची वेबसाइट https://pib.gov.in वर उपलब्ध आहे.

First published:

Tags: Narendra modi