'मी असे काहीही लिहिलेले नाही', व्हायरल होत असलेल्या त्या पोस्टवर भडकले रतन टाटा

'मी असे काहीही लिहिलेले नाही', व्हायरल होत असलेल्या त्या पोस्टवर भडकले रतन टाटा

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या नावाने एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 एप्रिल : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या नावाने एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये, 'कोरोनामुळे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मला या तज्ञांबद्दल फारसे माहिती नाही, परंतु मला नक्कीच हे माहित आहे की मात्र या तज्ज्ञांना प्रेरणा आणि मूल्य यांबद्दल काहीही माहिती नाही', असे लिहिले आहे. तसेच, या पोस्टमध्ये देशातील आणि जगातील अनेक घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. यासगळ्यातून जग कसं सावरलं, याबाबतही माहिती दिली आहे. ही पोस्ट रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल केली जात आहे. मात्र रतन टाटा यांनी ट्वीट करून, ही पोस्ट खोटी असल्याचे सांगितले आहे.

रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत, 'मी या गोष्टींचा उल्लेख केलेला नाही किंवा लिहिलेल्या नाहीत. व्हॉट्सअ‍ॅप व इतर मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरणार्‍या पोस्टची सत्यता तपासा. जर मला काही मत व्यक्त करायचे असेल तर मी ते माझ्या अधिकृत चॅनेलद्वारे करतो. मी आशा करतो की आपण सुरक्षित आहात आणि स्वत: ची काळजी घ्या', अशी माहिती दिली.

वाचा-कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला, हल्लेखोरांमध्ये एक होता पॉझिटिव्ह

वाचा-लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांकडून दगडफेक आणि जाळपोळ, पाहा हिंसाचाराचे PHOTOS

व्हॉट्सअॅपसह फेसबुकवर ही पोस्ट 'वेरी मोटिव्हेशनल अॅट दिस अव्हर' अशा नावाने व्हायरल केली जात आहे. या पोस्टमध्ये, “जर आपण तज्ज्ञांच्या मतावर विश्वास ठेवला तर, दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण विनाश झालेल्या जपानचे काही भविष्य नसते. माक्ष अवघ्या तीन दशकांत जपानने अमेरिकेला मागे टाकले. अरब देशांनी जगाच्या नकाशावरून इस्रायलचे नाव कधीच मिटवले असते, परंतु चित्र वेगळे आहे. भारताने 1983मध्ये वर्ल्ड कप नसता जिंकला, पण हे सगळं झालं", असे विविध संदर्भ देण्यात आले आहेत. तसेच, या पोस्टमध्ये, 'कोरोना संकट हे यांच्यासारखेच आहे. मला खात्री नाही की आपण कोरोना विषाणूचा पराभव करू आणि भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा आपल्या पायावर उभी राहिल", असेही लिहिले आहे. ही संपूर्ण पोस्ट रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल केली जात आहे.

वाचा-रिपोर्ट निगेटिव्ह असतील तरी निश्चिंत राहू नका, 70% लोकांना पुन्हा होतोय कोरोना

1500 कोटी केले दान, ताजमध्ये डॉक्टरांना दिल्या रुम्स

कोरोनाविरुद्धच्या लढाईत रतन टाटा यांनी 1 हजार 500 कोटींची मदत केली. ही मदत जाहीर केल्यानंतर त्यांनी ताज ग्रुपच्या मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रुमही दिल्या. अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स जर आपल्या कुटुंबीयांसोबत राहिले तर त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना वेगळं राहण्याची गरज असते. त्यामुळे समुहाने हा निर्णय घेतला आहे. कुलाब्यातलं हॉटेल ताज महल, बांद्र्यातलं ताज लँड्स, सांताक्रुजमधलं हॉटेल ताज आणि हॉटेल प्रेसिडंट या हॉटेल्समध्ये डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी या रुम्स देण्यात येत आहेत.

First published: April 11, 2020, 2:30 PM IST

ताज्या बातम्या