तबलिगी जमात तयार करतं रूह अफजा? काय आहे व्हायरल मेसेज मागचे सत्य

तबलिगी जमात तयार करतं रूह अफजा? काय आहे व्हायरल मेसेज मागचे सत्य

100 वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात भारतीयांची तहान भागवणाऱ्या रूह अफजाबाबत सध्या सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत.

  • Share this:

फहाद सईद

नवी दिल्ली, 25 एप्रिल : उन्हाळ्यात प्रत्येक घरात रूह अफजा (Rooh-Afza) असतेच. त्यामुळं हे पेय प्रत्येकाला माहित आहे. 100 वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात भारतीयांची तहान भागवणाऱ्या या पेयाच्या अनेक आठवणी आहेत. रमजानच्या इफ्तारमध्ये तर रूह अफजा खास स्थान असते. मात्र सध्या सोशल मीडियावर रूह अफजाबाबत्या काही अफवा पसरवल्या जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेजेसमध्ये रूह अफजावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.

असा दावा करण्यात आला आहे की, रूह अफजा तयार करणाऱ्या कंपनीमध्ये तबलिगी जमातीचे लोक काम करतात. याआधी तबलिगींबाबत अनेक अफवा पसरवल्या गेल्या आहेत. अशाच काही पोस्ट रूह अफजाबाबत पसरवल्या जात आहे. काही लोकांनी तबलिगी जमातीचे लोक रूह अफजा तयार करताना त्या थूंकत असल्याचे मेसेज व्हायरल केले. तर, काही लोकांनी रूह अफजा तयार करणारी कंपनी हमदर्द केवळ मुसलमान लोकांना नोकरी देत असल्याचा दावा केला आहे. मात्र हे सर्व दावे खोटे असल्याचे न्यूज-18च्या फॅक्ट चेकमध्ये आढळले आहे.

वाचा-खरं आहे की खोटं : 3 मेपर्यंत टेलिकॉम कंपनी इंटरनेट फ्री देणार?

रूह अफजा तबलिगी जमातचे प्रोडक्ट?

तबलिगी जमात आणि रुह अफजा यांचा काहीही संबंध नाही. तबलिगीची सुरुवात 1926मध्ये मेवात प्रांतात झाली. तर, रुह अफजा तयार करणाऱ्या कंपनीची स्थापना 1906मध्ये दिल्लीमध्ये झाली. तबलिगी जमात इस्लामचा प्रसार करतं तर हमदर्द ही कंपनी यूनानी पद्धतीनं औषधं आणि पेय पदार्थ तयार करतात. या अफवांबाबत हमदर्द कंपनीचे मुख्य विक्री व पणन अधिकारी मन्सूर अली यांनी न्यूज 18 ला सांगितले की, सोशल मीडियावर आमच्या ब्रॅंण्डची बदनामी केली जात आहे. अशा कठिण समयी, लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. आम्ही लोकांना अपील करतो की, असा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. असे पोस्ट काढून टाकण्यासाठी आम्ही सरकारी एजन्सीबरोबर काम करत आहोत.

वाचा-प्रत्येक शहरात सरकार हेलिकॉप्टरमधून टाकणार पैसे? हे आहे व्हायरल मेसेज मागचे सत्य

हमदर्द कंपनीत फक्त मुस्लिमांना दिली जाते नोकरी?

हमदर्द कंपनीत केवळ मुस्लिम समाजातील लोकांना नोकरी दिली जाते, हा दावाही आमच्या फॅक्ट चेकमध्ये खोटा ठरला आहे. Googleवर यासंबंधी keywords टाकून माहिती मिळू शकते. मन्सूर खान म्हणतात की हमदर्द कंपनीत एखाद्याला नोकरी देण्यासाठी त्या व्यक्तीची क्षमता, अनुभव आणि मानवी मूल्ये तपासली जातात. या आधारावर आम्ही नोकरी द्यायची की नाही हे ठरवतो, असे सांगितले.

वाचा-ब्रेड, बिस्कीटमुळे पसरतो कोरोनाव्हायरस? WHO च्या फोटोमागचं तथ्य काय?

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

First published: April 25, 2020, 11:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या