खरं की खोटं ! कुख्यात दहशतवादी अफझल गुरूच्या फोटोसह कन्हैया कुमार यांची रॅली?

खरं की खोटं ! कुख्यात दहशतवादी अफझल गुरूच्या फोटोसह कन्हैया कुमार यांची रॅली?

कुख्यात दहशतवादी अफझल गुरूच्या फोटोसह कन्हैया यांची रॅली? काय आहे व्हायरल सत्य?

  • Share this:

पाटणा, 13 मे : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीपीआयकडून बेगुसराय मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कन्हैया यांचा एक फोटो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये कन्हैया कुख्यात दहशतवादी अफझल गुरूचा फोटो घेऊन निवडणुकीचा प्रचार करत असल्याचं दिसत आहे. पण हा व्हायरल फोटो खरा आहे की खोटा? यासंदर्भातील तथ्य 'Network 18'नं पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. या पडताळणीमध्ये कन्हैया यांचा अझफल गुरूच्या फोटोसहीत व्हायरल झालेला फोटो खोटा असल्याची बाब समोर आली आहे.

पडताळणीमध्ये कन्हैया आणि अफझल गुरूचा फोटो मॉर्फ करण्यात आल्याचं सत्य समोर आलं आहे. अफझल गुरूच्या फोटोसहीत कन्हैया कुमार यांच्या प्रचाररॅलीची ही व्हायरल पोस्ट 5 मे 2019 रोजी फेसबुकवर शेअर करण्यात आली होती. फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात छेडछाड करण्यात आलेला हा फोटो शेअर केला गेला आहे.

वाचा :VIDEO...तर मोदी विजय चौकात फाशी घेतील काय? खर्गेंचं वादग्रस्त वक्तव्य

हा फोटो शेअर करताना हे कॅप्शन देण्यात आलं होतं :

'कन्हैया कुमार, अफझल गुरूचा फोटो घेऊन रोड शो करत आहे आणि जनतेकडे मतांची मागणी करत आहे. अफझल गुरू हा दहशतवादी होता. निवडणूक आयोग यावर आक्षेप का नोंदवत नाहीय? जरा विचार करा आणि योग्य निर्णय घेऊन आपलं मत द्या'

पाहा : EXCLUSIVE VIDEO मोदी मोदी घोषणा देणाऱ्यांना पाहून प्रियांका भर रस्त्यात गाडीतून उतरल्या आणि...

हा आहे व्हायरल फोटो

kanhaiya kumar, loksabha elections 2019, bihar lok sabha elections, fake news, kanhaiya kumar official social media, कन्हैया कुमार, बिहार लोकसभा चुनाव, लोकसभा चुनाव 2019, फेक न्यूज़, कन्हैया कुमार सोशल मीडिया

पण हा फोटो खोटा असल्याचं सत्य समोर आलं आहे. कन्हैया कुमार यांच्या रोड शोमधील फोटो आणि अफझल गुरूचा फोटो मॉर्फ करण्यात आला आहे. जेथे सीपीआयचं चिन्ह होतं ते हटवून त्या जागी अफझल गुरूचा फोटो लावून मूळ फोटोसहीत छेडछाड करण्यात आली.

गुगलवर यासंदर्भातील माहितीचा शोध घेतला असता कन्हैया यांनी आपल्या रॅलीचा फोटो 27 एप्रिल 2019 रोजी फेसबुकवर शेअर केला होता.

ही पाहा मूळ पोस्ट

kanhaiya kumar, loksabha elections 2019, bihar lok sabha elections, fake news, kanhaiya kumar official social media, कन्हैया कुमार, बिहार लोकसभा चुनाव, लोकसभा चुनाव 2019, फेक न्यूज़, कन्हैया कुमार सोशल मीडिया

बिहारच्या बेगूसराय येथील निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा फोटो कन्हैया यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: May 13, 2019, 9:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading