Fact Check : खरंच सुधा मूर्ती वर्षातून एकदा मंदिराबाहेर भाजी विकतात?

Fact Check : खरंच सुधा मूर्ती वर्षातून एकदा मंदिराबाहेर भाजी विकतात?

गेल्या काही दिवसांपासून सुधा मूर्ती यांचा भाजीसमोर बसलेला फोटो व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : काही दिवसांपासून इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका व तरुणांचा आदर्श असलेल्या सुधा मूर्ती यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सुधा मूर्ती भाज्यांसमोर बसलेल्या दिसत आहे. सोशल मीडियावर सुरभी नावाच्या युजर्सने हा फोटो ट्विट करीत सुधा मूर्ती वर्षातून एकदा भाजी विकत असल्याचे लिहिले होते. यानंतर हा फोटो खूपच व्हायरल झाला होता.

सुधा मूर्ती आयटी सेक्टरच्या सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहे. मात्र त्यांची ओळख इतकीच नाही, ही कंपनी उभी करण्यासाठी सुधा मूर्तींनी ( इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींची पत्नी) त्याग आणि परिश्रमांची पराकाष्ठा पार केली होती. सुधा मूर्तींची आतापर्यंत 92 पुस्तकं साधारणपणे सर्व भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध आहेत.

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये त्या भाजीसमोर बसल्या असल्या तरी त्या भाजी विकत नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली बातमी चुकीची असल्याची बाब सुधा मूर्ती यांनी स्पष्ट केली आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मी भाजी विकण्यासाठी बसलेली नाही. सोशल मीडियावर याबाबतच्या बातम्या ऐकून मला खूप त्रास झाला. मी तेथे भाजी गोळा करण्यासाठी बसले आहे. बंगळुरुतील माझ्या घराच्या जवळ राघवेंद्र मठात तीन  दिवसांच्या कार्यक्रमासाठी मी चांगल्या भाज्या गोळा करीत आहे. त्या पुढे म्हणाल्या की मी लहानपणासाठी येथे तीन दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी होते. माझ्या लहानपणी माझी आजी येथे येऊन सेवा करीत होती, त्यावेळी मी तिला मदत करीत असे. त्यानंतर आतापर्यंत मी हा नियम पाळते. यावेळी सुधा मूर्ती तीन दिवस किचन सांभाळतात आणि तेथे प्रसादासाठी भाज्या चिरणे, स्वच्छ करणे आदी कामं करतात.

Published by: Meenal Gangurde
First published: September 15, 2020, 10:26 PM IST
Tags: INFOSYS

ताज्या बातम्या