FACT CHECK : तुफान लोकप्रिय असणारी PUBG गेम बंद करण्याचा कंपनीने घेतला निर्णय?

FACT CHECK : तुफान लोकप्रिय असणारी PUBG गेम बंद करण्याचा कंपनीने घेतला निर्णय?

गेल्या काही काळापासून भारतात पबजी ही गेम तुफान लोकप्रिय ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 5 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा सोडून इतर लोकांना घरात थांबवण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. मग घरात विरंगुळा म्हणून कोणी वेबसीरिज बघतं तर कोणी मोबाईल गेम्स खेळण्याला प्राधान्य देतं. गेल्या काही काळापासून भारतात पबजी ही गेम तुफान लोकप्रिय ठरत आहे. लॉकडाऊनच्या काळातही तरुण-तरुणी याच गेमला पसंती दर्शवत आहेत.

एकीकडे लॉकडाऊनमध्ये विरंगुळ्यासाठी भारतात पबजी गेम मोठ्या प्रमाणात खेळण्यात येत असताना एक बातमी समोर आली. कंपनीने ही गेम 24 तासांसाठी बंद केल्याची बातमी काही माध्यमांनी दिली आहे. त्यामुळे या गेमच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली. या कंपनीने खरंच पबजी ही गेम 24 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे अर्धसत्य आहे. ही गेम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरीही तो काही विशिष्ट देशांसाठीच आहे.

“कोरोनाविरूद्ध लढा लढताना मृत्यूमुखी पडलेल्या देशवासीयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टेंन्सेन्ट गेम्स चीन, हाँगकाँग, मकाओ आणि तैवान प्रांतात 4 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून एक दिवसासाठी निलंबित केले जाईल,”असं कंपनीने म्हटलं आहे.

भारतातही बंद राहणार पबजी?

भारतातही पबजी गेम बंद राहणार असल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र यात कोणतंही तथ्य नाही. कंपनीने फक्त चार देशांमध्येच पबजी गेमला 24 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामध्ये भारताचा समावेश नाही. त्यानुसार आज देशभरात ही गेम सुरू आहे.

First published: April 5, 2020, 2:48 PM IST

ताज्या बातम्या