S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

हुश्श! तब्बल 12 तासांनी फेसबुक झालं सुरू

बुधवारी रात्री 9 पासून जगभरात फेसबुक वापरण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती.

Updated On: Mar 14, 2019 09:23 AM IST

हुश्श! तब्बल 12 तासांनी फेसबुक झालं सुरू

मुंबई, 14 मार्च : सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक पुन्हा पुर्ववत सुरू झाले आहे. बुधवारी फेसबुक बंद पडल्यानंतर वैतागलेल्या युजर्सनी ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला.

एखादी पोस्ट कोणी केली असेल तर त्यावर कमेंट किंवा लाईक करता येत नाही. तसेच लॉगइनची समस्याही युजर्सना येत आहे. फेसबुकच्या इतिहासात इतकी मोठी तांत्रिक अडचण निर्माण होण्याची ही दुसरी वेळ आहे.

यापूर्वी 2008 मध्ये फेसबुकला अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागले होते. तेव्हा 15 लाख युजर्स असलेल्या फेसबुकवर आज 2 अब्ज युजर्स आहेत. आतापर्यंत फेसबुक वापरताना अनेकदा अडचणी आल्या मात्र ट्विटर बाबत असे काही झाले नसल्याचे युजर्सनी म्हटले आहे.
VIDEO : भाजपला मोठा धक्का, माढ्यातून 'या' मंत्र्यांने घेतली माघार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2019 09:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close