धक्कादायक! सापाला पाहून बेशुध्द झाली तरुणी, पण तो साप नव्हताच तर...

हा व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 02:07 PM IST

धक्कादायक! सापाला पाहून बेशुध्द झाली तरुणी, पण तो साप नव्हताच तर...

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : तुम्ही कधी डोळ्यांसमोर साप पाहिला आहे का? यात जर तुम्ही सर्पमित्र असाल तर तुम्हाला कदाचित आनंद होईल पण सामन्यांची बोबडी वळेल. असाच एक प्रसंग नुकताच घडला. फेसबूक युझर फातिमा दाऊदनं आपल्या पोस्टमअध्ये आपल्या सोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाचा उलघडा केला.

फातिमानं काही दिवसांपूर्वी पार्किंगमध्ये साप पाहिला, ही घटना 22 सप्टेंबर रोजी घडली. सापाला पाहताच फातिमा जोरात किंचाळली. तिनं या सापाचा फोटोही फेसबूकवर शेअर केला. या फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-अतीशहाणपणा नडला! सिंहाच्या पिंजऱ्यात घुसली महिला, पाहा हा VIRAL VIDEO

या फोटोवर फातिमानं, "मी सगळ्यात आधी त्या वयस्कर महिलेची माफी मागते, सापाला पाहून जेव्हा मी किंचाळले तेव्हा मला पाहून ती घाबरली. मी लहानमुलांसारखी ओरडत होती. मला आधी वाटलं हा साप आहे, पण मी जवळून पाहिल्यानंतर मला कळलं की, हा साप नाही आहे", असे कॅप्शन लिहिले आहे.

वाचा-iPhoneचा नाद करायचा नाय! एक वर्षापूर्वी नदीत पडलेल्या फोनचं पाहा काय झालं

Loading...

ही पोस्ट 2 हजारहून अधिक लोकांनी शेअर केली आहे तर हजारहून अधिक लोकांनी यावर कमेंट केली आहे. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, साप नाही तर ते काय होतं? तर फातिमानं आपल्या पोस्टवर याचा खुलासा केला आहे. फातिमानं आपल्या पोस्टमध्ये, "हा साप नसून एका महिलेची खोटी वेणी होती. जर कोणाची वेणी हरवली असेल तर घेऊन जा. वेणीचे काहीही नुकसान झालेले नाही", असेही लिहिले आहे.

वाचा-8.5 फूटाचा मासा, किंमत 23 कोटी! पाहा काय केलं ‘एका कोळियानं’

ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल झाल्यानंतर एका युझरनं या पोस्टवर, "मला हसू आवरता येत नाही आहे. मी अजूनही जोर जोरात हसत आहे" तर आणखी एक युझरनं, "ही आतापर्यंतची सर्वात मजेशीर घटना होती. मी का उपस्थित नव्हतो तिकडे", अशी कमेंट केली आहे.

VIDEO: ठाण्यात गॅस पाईपलाईन फुटल्यानं उंच फवारे, परिसरातील गॅस पुरवठा बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 02:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...