मराठी बातम्या /बातम्या /देश /

फेसबुकमुळे तब्बल 45 वर्षांनी झाली दोन बहिणींची भेट

फेसबुकमुळे तब्बल 45 वर्षांनी झाली दोन बहिणींची भेट

सौ. इस्ट मोजो

सौ. इस्ट मोजो

फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपमुळे शाळेतले जुने मित्र भेटतात, त्यांच्यासोबत गेट टुगेदर करताना आपण पुन्हा जुन्या काळात रमतो. अशा भेटीगाठींबद्दल आपण सोशल मीडियाला धन्यवाद देतो. पण मित्रमैत्रिणीच नव्हे तर दोन बहिणी फेसबुकमुळे एकमेकींना भेटू शकल्या.

पुढे वाचा ...
  • Published by:  Arti Kulkarni
ऐझ्वाल, 19 जुलै : फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपमुळे शाळेतले जुने मित्र भेटतात, त्यांच्यासोबत गेट टुगेदर करताना आपण पुन्हा जुन्या काळात रमतो. अशा भेटीगाठींबद्दल आपण सोशल मीडियाला धन्यवाद देतो. पण मित्रमैत्रिणीच नव्हे तर दोन बहिणी फेसबुकमुळे एकमेकींना भेटू शकल्या. ही गोष्ट आहे मिझोरममधली. इथे राहणाऱ्या कमलाचं 1974 मध्ये हमिंगलियाना या सीआरपीएफ जवानाशी लग्न झालं. या लग्नानंतर ती 1978 मध्ये मिझोरमला आली आणि ऐझवालला राहू लागली. कमलाला तीन मुलंही झाली आणि हे कुटंुब मिझोरमचंच झालं. कमला मूळची आंध्र प्रदेशची. आता हा भाग तेलंगणामध्ये गेला आहे. आंध्र प्रदेशमधून मिझोरमला आल्यानंतर कमलाचा तिच्या कुटुंबाशी संपर्क तुटला होता. आर्थिक कारणांमुळे कमला, तिचा नवरा आणि मुलं मूळ घरी जाऊ शकत नव्हते. एकीकडे कमला मिझोरममध्ये राहून तिच्या घरच्यांची आठवण काढत होती तर तिचे घरचेही तिच्या शोधात होते. त्यांनी तिचा शोध घेण्याची चिकाटी सोडली नाही. कमलाची एक बहीण रुद्रपती अमेरिकेला राहते. तिने फेसबुकवरून आपल्या बहिणीचा शोध घ्यायचं ठरवलं. मेट्रोचं रक्षण करण्यासाठी आणला आहे हा सगळ्यात महागडा श्वान! रुद्रपतीने तिचे फोटो मिझोरम न्यूज या फेसबुकच्या ग्रुपवर शेअर केले. हे फोटो या ग्रुपमध्ये फिरत राहिले आणि अवघ्या दोन तासांत तिला कमलाचा शोध लागला. फेसबुकमुळे आता या दोन बहिणींची भेट होणार आहे. या कुटुंबाच्या पुनर्भेटीचा सोहळा मोठ्या थाटामाटात करण्याचं ठरलं आहे. पण कमलाला आता मिझोरम सोडून कुठेही जायची इच्छा नाही. मी इथल्या लोकांमध्ये पूर्णपणे मिसळून गेले आहे, असं ती सांगते. असं असलं तरी कुठे मिझोरम, कुठे आंध्र प्रदेश आणि कुठे अमेरिका... फेसबुकने मात्र ही सगळी अंतरं मिटवून टाकली आणि तब्बल 45 वर्षांनी दोन बहिणींची गाठ घालून दिली. सोशल मीडियामुळे अवघं जग जवळ आलं आहे असं म्हणतात ते काही उगीच नव्हे ! ============================================================================================= VIDEO : रात्रीच्या अंधारात आघाडीचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतात, चंद्रकांत पाटलांचा खुलासा
First published:

Tags: Facebook, Mizoram

पुढील बातम्या