काँग्रेसशी संबंधित 700 पेजेस फेसबुकने टाकली काढून, आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

फेसबुकने काँग्रेसशी संबंधित असलेली काही अकाउंट्स आणि फेसबुक पेजेस काढून टाकण्याची कारवाई केली आहे. अशा एकूण ६८७ अकाउंट्स आणि फेसबुक पेजेसवर ही कारवाई करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 03:41 PM IST

काँग्रेसशी संबंधित 700 पेजेस फेसबुकने टाकली काढून, आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

नवी दिल्ली, १ एप्रिल : फेसबुकने काँग्रेसशी संबंधित असलेली काही अकाउंट्स आणि फेसबुक पेजेस काढून टाकण्याची कारवाई केली आहे.अशा एकूण ६८७ अकाउंट्स आणि फेसबुक पेजेसवर ही कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी फेसबुक इंकने ही कारवाई केल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. या अकाउंट्सवर पोस्ट होणारी माहिती मुद्दाम अपप्रचार करणारी आहे, असं फेसबुक इंक या कंपनीने म्हटलं आहे.

३० कोटीपेक्षा जास्त युजर्स

फेसबुकचे भारतात ३० कोटीपेक्षा जास्त युजर्स आहेत. असं असताना भारतासारख्या मोठ्या देशात एका प्रमुख पक्षावर केलेली कारवाई गंभीर मानली जात आहे. भारतातली फेसबुक युजर्सची संख्या जगात सगळ्यात जास्त आहे.


Loading...


अनेक व्यक्तींनी फेक अकाउंट्स काढून वेगवेगळे ग्रुप जॉइन केले आहेत. अशा अकाउंट्समधून चुकीचा मजकूर पसरवला जातो. या पोस्टमध्ये स्थानिक पातळीवरचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबत चुकीची माहिती छापली जात आहे, असं फेसबुकने म्हटलं आहे.

ही फेक अकाउंट्स काढणाऱ्या व्यक्तींना त्यांची ओळख लपवायची आहे पण ही अकाउंट्स काँग्रेसच्या आयटी सेलशी जोडलेली आहेत, असंही फेसबुकच्या सायबर सिक्युरिटी विभागाने सांगितलं.

याचं उदाहरण म्हणून फेसबुकने दोन पोस्ट दाखवल्या आहेत. मोदींनी सुरू केलेल्या उपक्रमांना विरोध आणि राहुल गांधींना मोठ्या प्रमाणात पाठिंबा, असं या पोस्टचं स्वरूप आहे.

पाकिस्तानमधल्या अकाउंट्सवरही कारवाई

फेसबुकने पाकिस्तानमधून उघडलेल्या १०३ फेसबुक पेजेसवरही कारवाई केली आहे. ही अकाउंट्स पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क खात्याशी जोडलेली आहेत.

निवडणुकीच्या काळात राजकीय अपप्रचार किंवा एखाद्या व्यक्तीची बदनामी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना फेसबुकने थारा देऊ नये यासाठी फेसबुकवर जगभरातून दबाव आहे. भारत सरकारनेही फेसबुकला याबद्दल सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळेच फेसबुकने राजकीय जाहिरातींबद्दलचे नियम जास्त कडक केले आहेत.

गेल्याच आठवड्यात फेसबुकने फिलिपाइन्स, इराण आणि रशियामध्ये अशा प्रकारची कारवाई केली होती.

============================================================================================================================================================

VIDEO: हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केले; मोदींचं UNCUT भाषण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...