मराठी बातम्या /बातम्या /देश /

Facebook वरचं प्रेम: लग्नासाठी घर सोडून आली तरुणी; मुलाचा पगार ऐकताच म्हणाली मी नाही राहणार

Facebook वरचं प्रेम: लग्नासाठी घर सोडून आली तरुणी; मुलाचा पगार ऐकताच म्हणाली मी नाही राहणार

अटॅचमेंटच्या भावनेत ऑक्सिटोसिन हॉर्मोन वाढतात. ऑर्गेजममध्ये ऑक्सिटोसिनचा स्तर वाढतो. हेच एकमेकांबद्दल ओढ निर्माण करतं.

अटॅचमेंटच्या भावनेत ऑक्सिटोसिन हॉर्मोन वाढतात. ऑर्गेजममध्ये ऑक्सिटोसिनचा स्तर वाढतो. हेच एकमेकांबद्दल ओढ निर्माण करतं.

दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं आणि ते लग्न करण्यासाठी एकत्र आले. मात्र, मुलीला जेव्हा मुलाचा खरा पगार समजला तेव्हा तिनं लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.

  • Published by:  News18 Desk

धौलपूर, 16 जून : फेसबुकवरून झालेल्या प्रेमप्रकरणाच्या अनेक घटना अलीकडे समोर येत आहेत. फेसबुकवरून (Facebook love story) दोन अल्पवयीन मुलगा-मुलगीचं हे प्रेम प्रकरण चांगलंच पुढं पोहोचलं. त्या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. 16 वर्षीय संबंधित मुलगी लग्न करायचं म्हणून आपल्या घरातून मुलाकडे पळून आली. दोघांनी मग भेट झाल्यावर लग्न कसे करायचे आणि पुढील गोष्टी कशा जमवायच्या याबाबत चर्चा सुरू केली. त्यावेळी मुलीला मुलाचा पगार ऐकून धक्का बसला.

लग्न करण्यासाठी आग्र्याहून राजस्थानमधील धौलपूरला आलेल्या मुलीचा चांगलाच भ्रमनिरास झाला. मुलाला केवळ 1400 रुपये पगार असल्याचे समजल्याने तिनं थेट लग्न करू शकत नसल्याचं सांगितलं. रेल्वे स्थानकावर (Railway Station) हे दोघेही अल्पवयीन संशयास्पद स्थितीमध्ये दिसून येत होते. त्यामुळं त्यांना बाल सुधार समितीने बालकल्याण समितीचे सदस्य गिरीश गुजर आणि बृजेश मुकरिया यांच्यासमोर नेले. त्यावेळी मुलीने आपण आग्रा येथील असल्याचे सांगितले तर मुलगा धौलपूरचा रहिवासी आहे.

दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं आणि ते लग्न करण्यासाठी एकत्र आले. मात्र, मुलीला जेव्हा मुलाचा खरा पगार समजला तेव्हा तिनं लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. पगार कमी असला तरी घरची परिस्थिती चांगली आहे, असे सांगून मुलगा तिला घरी जाण्याचा आग्रह करत होता. पण ती तयार झाली नाही. या मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देऊन त्यांना पोलिसांनी धौलपूरला बोलावून घेतलं. सध्या या मुलीला बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे, असे समितीचे सदस्य गिरीश गुजर यांनी सांगितले.

हे वाचा - International Yoga Day: माधुरी दीक्षितसारखं फिट राहायचंय; तिच्याबरोबरच दररोज करा योगासनं, पाहा VIDEO मध्ये काय सांगतेय अभिनेत्री

मुलीकडून अधिक माहिती घेतल्यानंतर असं समजलं की, तिच्या वडिलांना दारूचे व्यसन जडले आहे. ते नेहमी घरात दारू पिऊन येतात आणि मुलीला मारहाण करतात. तर मुलीची फेसबुकवरून इकडे संबंधित अल्पवयीन मुलाची ओळख झाली होती. त्या दोघांना एकत्र राहायचे होते, असे समितीचे दुसरे सदस्य बृजेश मुकरिया यांनी सांगितले.

First published:

Tags: Facebook, Love story, Rajasthan