Facebook, Instagram आणि Whatsapp झालं डाऊन

Facebook, Instagram आणि Whatsapp झालं डाऊन

अनेक देशांमध्येही Facebook, Instagram आणि Whatsapp डाऊन झालं. नेमकं काय झालं याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही.

  • Share this:

मुंबई 3 जुलै : जगभरात सगळ्यात जास्त लोकप्रिय असणारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स म्हणजे Facebook, Instagram आणि Whatsapp.  बुधवारी सायंकाळी ही तीनही माध्यमं डाऊन झालीत. यावर फोटोच अपलोड होत नसल्याचं स्पष्ट झालं. सुरुवातीला ही तात्पुरती  अडचण असल्याचं सगळ्यांना वाटत होतं. मात्र नंतर प्रत्येकालाच ही अडचण जाणवू लागली आणि सोशल मीडियावर त्याबद्दल विचारणाही होऊ लागली. अनेक देशांमध्येही हीच अडचण असल्याचही पुढं आलंय. नेमकं काय झालं याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही.

Facebook, Instagram आणि Whatsapp शिवाय आता पानंही हलत नाही असं म्हटलं तरी आता अतिशयोक्ती ठरणार नाही. जगातले कोट्यवधी लोक ही माध्यमं वापरत जगाशी संवाद साधत असतात. दर मिनिटाला काही लाख व्हिडीओ आणि फोटो या साईट्सवर अपलोड केले जातात. सगळ्या नेट व्यवहारावर लक्ष ठेवणाऱ्या Down Detector या वेबसाईटनेही ही माध्यमं डाऊन झाल्याचं म्हटलं आहे. युरोप, अमेरिका आणि जपानमध्येही हीच अडचन सगळ्यांना येतेय.

ओमान एअरलाईन्सच्या विमानचं मुंबईला इमर्जन्सी लँडींग, 200 प्रवासी बचावले

टिकटॉकमुळे लागला नवऱ्याचा शोध

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर यामुळे एकमेकांच्या संपर्कात असणं सोपं झालं आहे. त्यातच शेअरचॅट, हॅलो, टिकटॉक अशा अ‍ॅपची भर पडली आहे.

काही दिवसांपूर्वी टिकटॉकवर म्युझिक व्हिडिओ बनवल्याप्रकऱणी ओडिशामधल्या नर्सेसवर कारवाई झाली होती.या नर्सेसनी नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात टिकटॉक व्हिडिओ बनवला. याबद्दल त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं.

मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या, फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, फरक पडत नाही!

असं असलं तरी याच टिकटॉकमुळे तामिळनाडूमध्ये एका बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध लागला आहे. ही व्यक्ती आपली पत्नी आणि मुलांना सोडून गेली होती. पण टिकटॉक अ‍ॅपमुळे पोलिसांना त्यांना शोधून काढता आलं.

तामिळनाडूमधल्या विल्लूपुरममध्ये राहणारे सुरेश 2016 मध्ये आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून पळून गेले होते. त्यांची पत्नी जयाप्रदा त्यामुळे खूपच चिंतेत होत्या. जयाप्रदा आपल्या दोन मुलांना घेऊम कसेबसे दिवस काढत होत्या.

एकदा मात्र एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. जयाप्रदा यांच्या कुणीतरी नातेवाईकांना हे सुरेश टिकटॉक अ‍ॅपवर दिसले. जयाप्रदा यांनी याआधीही पोलिसांत तक्रार केली होती पण त्यांचा शोध लागत नव्हता. यावेळी मात्र जयाप्रदा यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि टिकटॉक अ‍ॅपवर असलेल्या त्या व्यक्तीबद्दल पोलिसांना माहिती दिली.

First published: July 3, 2019, 8:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading