दिल्ली दंगल प्रकरण: राज्य विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव

दिल्ली दंगल प्रकरण: राज्य विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव

समितीने फेसबुकच्या पत्रावर आक्षेप घेतला असून हे पत्र म्हणजे सभागृहाचा अवमान असल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 22 सप्टेंबर: दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सद्भावना समितीने Facebookला नोटीस दिली होती. Facebookच्या अधिकाऱ्यांनी समितीसमोर हजर व्हावं असं त्या नोटीसमध्ये बजावण्यात आलं होतं. या नोटीशी विरोधात मंगळवारी Facebook Indiaने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणावर बुधवारी (23 सप्टेंबर)ला कोर्टात सुनावणी होणार आहे.

फेसबुकने चिथावणीखोर भाषणांविरोधात तातडीने कारवाई केली नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दिल्ली दंगलीची आग भडकण्यास मदत झाली असं वृत्त Wall Street Journalने दिलं होतं. त्यावरून देशभर वादळही निर्माण झालं होतं. त्याच प्रकरणी ही नोटीस पाठविण्यात आली होती.

Facebook Indiaचे उपाध्यक्ष अजित मोहन यांनी ही याचिका दाखल केली आहे. विधानसभा समितीने पाठवलेल्या नोटीशीनंतरही फेसबुकडून कुणी उपस्थित झालं नव्हतं. तर फेसबुकच्या वतीने समितीला पत्र पाठवून ती नोटीस परत घेण्याची विनंती करण्यात आली होती.

समितीने फेसबुकच्या पत्रावर आक्षेप घेतला असून हे पत्र म्हणजे सभागृहाचा अवमान असल्याचं म्हटलं आहे. हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठविण्याची शिफारसही समितीच्या अध्यक्षांनी केली आहे.

फेसबुक हे केंद्र सरकारची भलामण करत असल्याचा आरोपही या समितीने केला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 22, 2020, 11:17 PM IST

ताज्या बातम्या