Home /News /national /

'किसान एकता मोर्चा'चं पेज अचानक झालं स्पॅम! 3 तासांत Facebook नं केला खुलासा

'किसान एकता मोर्चा'चं पेज अचानक झालं स्पॅम! 3 तासांत Facebook नं केला खुलासा

फेसबुकवर (Facebook) अनेकदा पक्षपाती असल्याचे आरोप होत असतात. (Farmers Protest) किसान एकता मोर्चाचं (Kisan Ekta Morcha) पेज ब्लॉक केल्यानंतर टीका झाली आणि फेसबुकला ही कारवाई मागे घ्यावी लागली.

    नवी दिल्ली, 21 डिसेंबर  : शेतकरी आंदोलन (farmers protest) ऐन भरात आहे. जमिनीवरच्या लढ्यासह या आंदोलनकर्त्यांनी सोशल मिडियाचाही प्रभावी वापर सुरू ठेवलाय. YouTube चॅनलसह फेसबुक पेजच्या (Facebook page) माध्यमातूनही आंदोलनाच्या अपडेट्स लोकांपर्यंत पोचवल्या जात आहेत. लोकांनीही याला उचलून धरलं आहे. शेतकरी आंदोलनाच्या बाजूने आणि विरोधात या पेजवर सातत्याने पोस्ट होत असतात. पण अचानक रविवारी सकाळी 'किसान एकदा मोर्चा' चं Fb page स्पॅम (Spam) ठरवण्यात आलं. त्यामुळे आंदोलकांमध्ये नाराजी पसरली. पण तीनच तासात फेसबुकने आपली चूक मान्य करत कारवाई चुकीचं असल्याचं कबूल केलं. फेसबुकला कुठल्याही संशयास्पद पेजबद्दल शंका आली किंवा कुणी पेजबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया कळवल्या आणि त्या फेसबुक धोरणांचं उल्लंघन करणाऱ्या असतील तर ते बॅन करता येतं.  फेसबुकनं रविवारी किसान एकता मोर्चा हे पेज काही तासांसाठी बॅन केलं होतं. मात्र लोकांच्या तीव्र विरोधानंतर फेसबुकनं हे पेज पुन्हा रिस्टोअर केलं आहे. फेसबुकच्या प्रवक्त्यानं यासंदर्भात आता खुलासा केला आहे. फेसबुकच्या म्हणण्यानुसार, किसान एकता मोर्चा या पानावर अचानक खूप अ‍ॅक्टिव्हिटी वाढल्याने आमच्या स्वयंचलित यंत्रणेला हे पेज स्पॅम असल्याची शंका आली होती. आमच्या कम्युनिटी स्टॅन्डर्डड्सच्या हे विरोधात जात असल्याने आम्ही हे पान हटवण्याची कारवाई केली होती. मात्र या पानाबाबतचं वास्तव आम्हाला समजलं तसं तीन तासाहून कमी काळातच आम्ही हे पान रिस्टोअर केलं. किसान एकता मोर्चाच्या पानाला पाचेक दिवसातच 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे, या ग्रुपच्या Instagram अकाउंटवरही निर्बंध टाकण्यात आले होते, ज्यानंतर फोटो आणि व्हिडिओज टाकायला त्यांना मनाई केली गेली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Facebook, Protesting farmers, Social media

    पुढील बातम्या