प्रयागराज, 9 मार्च : येथील फुथगंज येथे राहणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या तरुणीला कोल्ड्रिंकमध्ये अमली पदार्थ घालून प्यायला दिले होते. तरुणी अमली पदार्थाच्या नशेत असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिला खोलीत बंद ठेवून मारहाण, शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती तरुणीने पोलिसांना दिली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आज तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
ही घटना करेली परिसरातील आहे. येथील 24 वर्षीय तरुणीची ओळख फेसबुकच्या माध्यमातून येथीलच रहिवासी अमन खान सोबत झाली होती. पीडित मुलीचा आरोप आहे की, फेसबुकवर बोलत असताना हळू हळू अमनने तिच्याशी ओळख वाढवली. मग एके दिवशी त्याने त्याने तरुणीला फसवून आपल्या घरी नेले. तरुणीला कोल्डड्रिंक्समधून औषध दिले व तिच्यावर बलात्कार केला.
एवढेच नाही तर नंतर तिला घरी बोलावून खोलीत बंद करुन मारहाण केली व शिवीगाळ केली. तेथेच तिला ठार मारण्याची धमकीही दिली. पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या तक्रारीच्या आधारे आरोपी अमनची आई आणि मामावर यांच्याकडून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी आरोपी अमनला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हे वाचा - कॅब ड्रायवरने मागितले पैसे तर महिलेने फाडले कपडे, स्टेशनवर हायवोल्टेज ड्रामा
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.