कोलकाता 11 ऑक्टोंबर : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्टी. पण लग्न मनासारखं जमनं हे तसं काही आपल्या हातात नसतं. आपण जे स्वप्न पाहतो ते पूर्ण होईलच असं काही नाही. मात्र पश्चिम बंगालमधल्या Facebook मित्र आणि मैत्रिणीमध्ये स्वप्नवत वाटणारी ही गोष्टी प्रत्यक्षात आली आणि एखाद्या चित्रपटात शोभावं तसं त्यांचं लग्न अगदी फिल्मी पद्धतीने पार पडलं. त्या दोघांची Facebookवर तीन महिन्यांपूर्वी मैत्री झाली. नंतर ही मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत गेली. नंतर दुर्गा पूजेदरम्यान ते पहिल्यांदाच भेटले आणि एकमेकांना पाहताच त्यांनी कायमचं एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. बंगालमधल्या सुदीप घोषाल आणि प्रितमा बॅनजी या तरुणांची ही कहाणी.
सुदीप हा एका मल्टिनॅशन कंपनीत काम करतो. तर प्रितमा ही स्वत:चं बुटीक चालवते. दोघही साधारण 30-35च्या आसपास. सुदीप आणि प्रितमाची 25 जुलैला Facebookवर मैत्री झाली. दोघांनीही चॅटिंग करायला सुरूवात झाली. ही मैत्री दिवसेंदिवस फुलत गेली. नंतर दोघही व्हिडीओ कॉलवर बोलायला लागले. दोघही चांगले मित्र झाले तरी एकमेकांवरच्या प्रेमाचं त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. 'हिंदुस्तान टाईम्स'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
बापरे...! Income Tax च्या छाप्यात सापडली तब्बल 100 कोटींचे बेहिशेबी संपत्ती
प्रितमा ही कोलकातातल्या एका दुर्गापूजेत सहभागी होणार असल्याचं सुदीपला कळालं. योगायोगाने त्याचंही त्याच दिवशी कोलकात्यात जाणं झालं. त्याने पत्ता शोधत तो दुर्गापूजेचा मंडप शोधून काढला आणि तो सरळ मंडपात जाऊन पोहोचला. सुदीप आणि प्रितमाची प्रत्यक्ष पहिल्यांदाच तीन महिन्यानंतर भेट झाली. दोघांनीही एकमेकांना पाहताच नेमकं काय ते ओळखून घेतलं.
यावेळी उत्साहाने भरलेल्या मंडपात प्रितमा हिच्या मैत्रिणीही होत्या. सुदीपने क्षणाचाही विलंब न लावता गुडघे टेकत सर्वांसमोर प्रितमाला प्रपोज केलं. सुदीपच्या या कृतीला सगळ्यांनीच दाद दिली. त्याचा हा साधेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून प्रितमाही भारावली. नंतर तिच्या मैत्रिणींनी त्या दोघांसाठीही टाळ्यांचा कडकडाट केला. भारावलेलं उत्साही वातावरण, दुर्गापूजेचा सोहळा असं सगळं वातावरण असताना दोघांनीही चक्क लग्नाचाच निर्णय घेतला. सुदीपने प्रितमाच्या कपाळावर सिंदूर भरला आणि दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि चार तासात लग्न पार पडलं.