Home /News /national /

काँग्रेसच्या दबावानंतर अखेर भाजप आमदाराला facebook ने केलं Ban

काँग्रेसच्या दबावानंतर अखेर भाजप आमदाराला facebook ने केलं Ban

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या प्रचंड दबावानंतर Facebook ने द्वेषमूलक (hate speech) मजकूर पोस्ट केल्याबद्दल भाजपच्या एका आमदाराविरोधात कारवाई केली आहे.

    नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या प्रचंड दबावानंतर Facebook ने द्वेषमूलक (hate speech) मजकूर पोस्ट केल्याबद्दल भाजपच्या एका आमदाराविरोधात कारवाई केली आहे. भारतीय जनता पक्षाचे तेलंगणाचे आमदार राजा सिंह (facebook put ban on MLA Raja singh) यांना facebook, instagram वापरायला बंदी करण्यात आली आहे. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात म्हटलं आहे की, 'Facebook च्या धोरणांचं उल्लंघन करणारा मजकूर आमच्या प्लॅटफॉर्मवरून प्रसिद्ध केल्याने आम्ही राजा सिंह यांच्यावर बंदी घातली आहे. आमच्या माध्यमाचा वापर करून हिंसा आणि द्वेष पसरवण्यास कारणीभूत ठरणारा मजकूर प्रसिद्ध करणं फेसबुकच्या धोरणात न बसणारं आहे. धोरणांचं उल्लंघन करणाऱ्यांना शोधणं ही मोठी किचकट प्रक्रिया आहे आणि त्यातूनच फेसबुकने राजा यांचं अकाउंट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ' Wall Street Journal (WSJ) ने काही दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्तात  फेसबुकने भारतातल्या सत्ताधारी भाजपला पूरक ठरणाऱ्या धोरणांचा अवलंब केल्याचा आरोप केला होता. भाजप आमदार राजा सिंह यांच्या द्वेषमूलक आणि हिंसेला खतपाणी घालणाऱ्या भाषणाकडे Facebook ने जाणीवपूर्वर दुर्लक्ष केल्याचं WSJ ने आपल्या बातमीत म्हटलं होतं. तेव्हापासून काँग्रेसने हा विषय उचलून धरत फेसबुकवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला होता. फेसबुकचे भारतात सर्वाधिक यूजर आहेत. सुमारे 30 कोटी भारतीयांचं फेसबुकवर अकाउंट आहे. त्यामुळे facebook वरच्या कंटेण्टचा मोठा प्रभाव दिसतो. WSJ च्या वृत्तानंतर भारतात यावर मोठी चर्चा सुरू झाली. संसदीय समितीने फेसबुकच्या प्रतिनिधींना पाचारण केलं. बुधवारी ही बैठक झाली. त्यानंतर फेसबुकने हा निर्णय जाहीर केला आहे. तत्पूर्वी माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीसुद्धा फेसबुकला पत्र लिहून त्यांचे कर्मचारी फेसबुक प्रतिनिधींच्या बैठकीत ठराविक राजकीय विचारांना पाठबळ देतात, असा आरोप केला. ज्येष्ठ मंत्री आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही आक्षेपार्ह मजकूर लिहिला जातो आणि त्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आक्षेप घेत नाही, असा आरोप प्रसाद यांनी केला. या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी फेसबुक प्रतिनिधींबरोबर आज संसदीय समितीची बैठक झाली. त्यात सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी आपापली भूमिका मांडली आणि फेसबुक एकांगी मजकुराला आणि विखारी प्रचाराला थारा देतं, असे आरोप केले.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या