मुंबई, 18 ऑगस्ट : फेसबुक आणि यूट्यूबवर वादग्रस्ट व्हिडीओसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयासमोर बाजू मांडताना फेसबुक आणि यूट्यूबने महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
न्यायालयानं वा केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आदेश दिले तर आम्ही राजकीय पक्षाचं समर्थन करणाऱ्यांना ब्लॉक करू शकतो, अशी भूमिका फेसबुक आणि यूट्यूबने उच्च न्यायालयात मांडली.
एआयएमआयएमचा समर्थक अबू फैजल नावाच्या व्यक्तीविरोधात मुंबईतील रहिवाशी इम्रान मोईन खान यांनी याचिका दाखल केली आहे. अबू फैजल या व्यक्तीने दोन समाजात तेढ निर्माण होतील, अशी स्वरुपातील व्हिडीओ अपलोड केला आहे, त्यामुळे त्याला फेसबुक व यूट्यूबवर ब्लॉक करण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असून मे महिन्यात झालेल्या सुनावणीच्यावेळी अबू फैजलने अपलोड केलेला हा व्हिडीओ डिलीट करण्याचे आदेश फेसबूक आणि यूट्यूबला देण्यात आले होते. या याचिकेवर सोमवारी सुनावणी. यावेळी फेसबूक आणि यूट्यूबकडून दारुस खंबाटा आणि नरेश ठाकर यांनी बाजू मांडली.
हे वाचा-Air Indiaच्या विमानांना हाँगकाँगला जाण्यास बंदी; चिनी सरकारच्या निर्णयामुळे खळबळ
दोघांनी न्यायालयात सांगितले की, अबू फैजल याने अपलोड केलेला व्हिडीओ काढून टाकण्यात आला आहे. त्यावर शुक्ला यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की हा व्हिडीओ डिलीट केल्यानंतर एमआयएमचा समर्थक फैजल अधिक व्हिडीओ अपलोड करीत आहे. यावर फेसबुकच्यावतीने खंबाटा यांनी सांगितले की, न्यायालयानं वा केंद्र सरकारने कायद्यानुसार फेसबुक आणि यूट्यूबवर एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.