तिरुअनंतपुरम, 20 जुलै: केरळची राजधानी तिरुअनंतपुरममधील येथील रहिवासी असणारे 85 वर्षीय गोपालकृष्णन धार्मिक समरसतेचा उदाहरण ठरत आहेत. एकीकडे देशात बाबरी मशीदीवरून वाद पेटत असताना, या भल्या माणसाने धर्माच्या चौकटीतून बाहेर पडत, देशात तब्बल 111 मशिदी बांधल्या आहेत. खरंतर त्यांच्या कार्यालयातील टेबलवर भगवतगितेसोबत कुराण आणि बायबल देखील पाहायला मिळतं. गोपालकृष्णन यांना अगदी बालपणापासून धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तूंचं आकर्षण आहे. त्यांनी केरळमध्ये आतापर्यंत अनेक धार्मिक वास्तू बांधल्या आहेत. ज्यामध्ये 111 मशिदीसह 4 चर्च आणि एक मंदिराचा समावेश आहे. तर पलायम जुमा मशिद हे सर्वाचं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
विशेष म्हणजे ही मशिद बांधण्यासाठी एका ख्रिश्चन व्यक्तीनं फंड पुरवला होता. आता जगभरातील लोकं ही पलायम जुमा मशिद पाहण्यासाठी येत असतात. ख्रिश्चन व्यक्तीकडून पैसे घेऊन एका हिंदू व्यक्तीनं मशिद बांधणं ही धार्मिक समरसतेचं एक उत्तम उदाहरण ठरत आहे.
हेही वाचा-निधी सिवाच यांनी IAS ऑफिसर होण्यासाठी 6 महिने केलं स्वत:ला Lockdow
दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, गोपालकृष्णन यांचे वडील गोविंदन हे एक ठेकेदार होते. त्यांना पलायम जुमा मशिद बांधण्याचं कंत्राट मिळालं होतं. या मशिदीबद्दल आठवण सांगताना गोपालकृष्ण यांनी सांगितलं की, 1962 सालच्या उन्हाळ्याच्या दिवसांत पलायम जुमा मशिदीचं काम सुरू झालं होतं. त्यावेळी मीही वडिलांना बांधकामाच्या विविध कामात मदत करत होतो. या मशिदीच्या बांधकामाच्या पैशासाठी मी तत्कालीन एजी कार्यालयाचे ऑफिसर पीपी चुम्मर यांना भेटलो.
हेही वाचा-विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सतीश मेनन यांच्याकडे क्लाससाठी नव्हते पैसे; तरीही पास
चुम्मर यांनी त्यावेळी मला 5,000 रुपये उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे चुम्मर एक ख्रिश्चन होते आणि मदत करून त्यांनाही फार आनंद झाला होता. या मशिदीचं बांधकाम पूर्ण व्हायला पाच वर्षांचा कालावधी लागला. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या हस्ते या मशिदीचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यानंतर आता त्यांनी मंदिरं आणि चर्च देखील बांधायला सुरुवात केली आहे. त्यांनी धर्माच्या चौकटीतून बाहेर पडत खऱ्या अर्थानं माणुसकीचा चेहरा बनले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kerala