आम्ही F - 16 विमान पाडलं, भारतीय वायुदलाचं पाकला प्रत्युत्तर

आम्ही F - 16 विमान पाडलं, भारतीय वायुदलाचं पाकला प्रत्युत्तर

भारताने पाकिस्तानचं F-16 हे विमान पाडलंच नाही, असा दावा पाकिस्तानने केला होता. पण आमच्याकडे हे विमान पाडल्याचे पुरावे आहेत, असं भारताने म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 एप्रिल : भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने F-16 विमानं वापरून त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. यापैकी एक F-16 विमान पाडल्याचा दावा भारताने केला. पण पाकिस्तानला दिलेली सगळी F-16 विमानं सुरक्षित आहेत, असं आता अमेरिकेने म्हटलं आहे. फॉरिन पॉलिसी मासिकाच्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती आली आहे.

यानंतर पाकिस्ताननेही, भारताने F-16 विमान पाडलंच नाही, असा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी या अहवालातली माहिती ट्वीट केली आहे. याबद्दल अल्लाचे आभार मानले पाहिजेत.सत्याचा विजय झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या या दाव्यावर भारताच्या हवाई दलाने आता उत्तर दिलं आहे. २७ फेब्रुवारीला दोन लढाऊ विमानं पाडण्यात आली होती. यामध्ये एक विमान हे भारतीय मिग २१ विमान होतं आणि दुसरं पाकिस्तानचं F-16 हे विमान होतं, असं भारताने म्हटलं आहे. भारताच्या मिग - २१ विमानाने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं होतं, असं भारताच्या वायुदलाने म्हटलं आहे. याबदद्लचे सगळे पुरावे भारताकडे आहेत.

भारताला पाडलं खोटं

भारताने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानमधल्या बालाकोटवर हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने लगेचच F-16 विमानांनी हल्ला करून त्याला उत्तर दिलं. भारताने या हल्ल्याचा प्रतिकार करताना पाकिस्तानचं एक F-16 विमान पाडलं होतं.भारतीय हवाई दलाने F-16 विमान पाडल्याचे अवशेषही दाखवले होते पण भारताचा हा दावा अमेरिकेने खोटा ठरवला आहे.

पाकिस्ताननेही तेव्हाच हे विमान पाडल्याचा इन्कार केला होता. तसंच भारताविरुद्ध F-16 विमानं पाठवलीच नाहीत, असंही पाकिस्तानचं म्हणणं होतं.

फॉरिन पॉलिसी मासिकाने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानने अमेरिकेला F-16 विमानांची गणना करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर अमेरिकेने ही सगळी विमानं सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.

======================================================================================================================================================================

VIDEO : लुंग्या-सुंग्यांना उत्तर देत नाही, शरद पवारांचा मोदींवर घणाघात

First published: April 5, 2019, 7:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading