मिग-21नेच पाडलं पाकिस्तानचं F-16, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं हवाई दलाचं आवाहन

मिग-21नेच पाडलं पाकिस्तानचं F-16, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं हवाई दलाचं आवाहन

अभिनंदनच्या नावावर त्याचे सोशल मीडियावर अनेक अकाऊंट्स तयार झाले आहेत. हे सर्व अकाउंट्स बनावट असल्याचं स्पष्टिकरणही हवाईदलाने दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 6 मार्च  : भारताच्या बालाकोटच्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारताच्या हवाई हद्दीचा भंग केला होता. त्यानंतर हवाई दलाने पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पाडलं होतं. त्यावरून आता सोशल मीडियावर उलट सुलट बातम्या येत आहेत. त्यावर हवाई दलाने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन हवाई दलाने केलं आहे. पाकिस्तान खोटी माहिती पसरवीत असल्याच मतही संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

हवाई दलाचा बालाकोटचा हल्ला आणि त्यानंतरची पाकिस्तानने काढलेली कुरापत यावरून सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं आहे. त्यावर हवाई दलाने 28 फेब्रुवारीला स्पष्टिकरण दिलं होतं. 26 ताखेला भारताने हवाई हल्ला केला. 28 तारखेला सकाळी पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानांनी भारताच्या हवाई हद्दीचा भंग केला.

या विमानांना पिटाळून लावण्याची कामगिरी विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 च्या मदतीने पार पाडली. हा पाठलाग करताना F-16 हे लढाऊ विमान मिग-21 ने पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाडलं होतं. नंतर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडला आणि त्याची दोन दिवसांमध्ये सुटकाही झाली.

त्यानंतर अभिनंदनच्या नावावर त्याचे सोशल मीडियावर अनेक अकाऊंट्स तयार झाले आहेत. हे सर्व अकाउंट्स बनावट असल्याचं स्पष्टिकरणही हवाईदलाने आज दिलं.

हवाई दालाने प्रसिद्धीपत्रक आणि पत्रकार परिषदेत जी माहिती दिली तीच माहिती अधिकृत असून इतर कुठल्याही माहितीवर विश्वास ठेवू नका, व्हिडीओ फॉरवर्ड करू नका असं आवाहनही हवाईदलाने केलं आहे.

भाजप खासदाराने आपल्याच पक्षाच्या आमदाराला बुटाने बडवले, VIDEO व्हायरल

First published: March 6, 2019, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading