पाकिस्तानची सगळी F-16 विमानं सुरक्षित, अमेरिकेचा भारताला मोठा धक्का

पाकिस्तानची सगळी F-16 विमानं सुरक्षित, अमेरिकेचा भारताला मोठा धक्का

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने F-16 विमानं वापरून त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. यापैकी एक F-16 हे विमान पाडल्याचा दावा भारताने केला. पण पाकिस्तानला दिलेली सगळी F-16 विमानं सुरक्षित आहेत, असं आता अमेरिकेने म्हटलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, ५ एप्रिल : भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने F-16 विमानं वापरून त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. यापैकी एक F-16 हे विमान पाडल्याचा दावा भारताने केला. पण पाकिस्तानला दिलेली सगळी F-16 विमानं सुरक्षित आहेत, असं आता अमेरिकेने म्हटलं आहे. फॉरिन पॉलिसी मासिकाच्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती आली आहे. अमेरिकेच्या या नव्या दाव्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.

भारताविरुद्ध F-16 विमानं वापरण्यामध्ये काहीही गैर नाही, असं प्रमाणपत्रही अमेरिकेने पाकिस्तानला दिलं आहे. जेवढी विमानं पाकिस्तानला दिली होती ती सगळीच विमानं पाकिस्तानकडे आहेत, असा निर्वाळा त्यांनी दिला आहे. याआधी पाकिस्तानने F-16 विमानं वापरल्याबद्दल अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती.

भारताला पाडलं खोटं

भारताने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानमधल्या बालाकोटवर हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने लगेचच F-16 विमानांनी हल्ला करून त्याला उत्तर दिलं. भारताने या हल्ल्याचा प्रतिकार करताना पाकिस्तानचं एक F-16 विमान पाडलं होतं.भारतीय हवाई दलाने F-16 विमान पाडल्याचे अवशेषही दाखवले होते पण भारताचा हा दावा अमेरिकेने खोटा ठरवला आहे.

पाकिस्ताननेही तेव्हाच हे विमान पाडल्याचा इन्कार केला होता. तसंच भारताविरुद्ध F-16 विमानं पाठवलीच नाहीत, असंही पाकिस्तानचं म्हणणं होतं.

फॉरिन पॉलिसी मासिकाने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानने अमेरिकेला F-16 विमानांची गणना करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर अमेरिकेने ही सगळी विमानं सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकेच्या दाव्यात किती तथ्य?

अमेरिकेच्या दाव्यावर संरक्षणतज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमेरिकेच्या या दाव्यामुळे भारतासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत, असं MIT चे प्राध्यापक विपिन नारंग यांनी म्हटलं आहे. भारत पाकिस्तानचं नुकसान करण्यामध्ये कमी पडला, असा याचा अर्थ होतो, असं विपिन नारंग म्हणाले. पाकिस्तानने मात्र भारताचं एक लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर पाडलं होतं.

अमेरिका आणि पाकिस्तानने F-16 बद्दल वेगळाच दावा केला असला तरी F-16 विमानांबद्दलचं नेमकं सत्य बाहेर यायला आणखी काही काळ लागेल. भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या हवाई हल्ल्याला मात्र जगभरातून पाठिंबा मिळाला होता.

================================================================================================================================================================

VIDEO : 2014 मध्ये बारामती का जिंकता आली नाही? मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' कारण

First published: April 5, 2019, 3:15 PM IST
Tags: pakistan

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading