भारतानं पाडलेल्या पाकिस्तानच्या F-16 विमानाचा पहिला फोटो आला समोर

भारतानं पाडलेल्या पाकिस्तानच्या F-16 विमानाचा पहिला फोटो आला समोर

भारतानं पाकिस्तानच्या पाडलेल्या F-16 या विमानाचे अवशेष आता सापडले आहेत.

  • Share this:

दिल्ली, 28 फेब्रुवारी : बुधवारी भारतानं पाकिस्तानचं F-16 पाडलं. पण, पाकिस्ताननं मात्र या वृत्ताचा इन्कार केला होता. दरम्यान भारतानं पाडलेल्या या विमानाचे फोटो आता समोर आले आहेत. त्याचे अवशेष देखील सापडले आहेत. मंगळवारी पहाटे 30 वाजून 30 मिनिटांनी भारतानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्ताननं देखील बुधवारी पहाटे भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांचा काही टिकाव लागला नाही. यामध्ये भारतानं पाकिस्तानं F-16 हे विमानं पाडलं. त्याचे फोटो आता समोर आले आहेत.

दरम्यान, मिग - 21 क्रॅश झाल्यानं पाकिस्तानच्या हद्दीत उतरलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्याच्या सुटेकसाठी भारतानं प्रयत्न सुरू केले असून पाकिस्ताननं देखील त्यांच्या सुटकेची तयारी दर्शवली आहे. पण, सध्या तरी पाकिस्तान आडमुठी भूमिका घेताना दिसतंय.

दोन्ही देशांमध्ये तणाव

14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात तसेच दहशतवाद्यांविरोधात कडक पावलं उचलली. दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केल्याचा इशारा भारतानं दिला होता. त्यानंतर भारतानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्ना केला. यावेळी पाकिस्तानी नागरिकांना इजा पोहोचणार नाही याची काळजी भारतानं घेतली.

दरम्यान, भारताला धमकी देणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारतापुढे नरमाईची भूमिका घेत चर्चेनं मार्ग काढू असा प्रस्ताव ठेवला आहे. दोन्ही देशांमधील वाढता तणाव पाहता चीनसह रशियानं शांततेचं आवाहन केलं आहे. रशियानं तर दोन्ही देशांमध्ये मध्यस्तीची भूमिका निभावायला तयार असल्याचं म्हटलं आहे.

अॅसिड बॉम्ब हल्ल्याचा कट उधळला, 2 दहशतवाद्यांना अटक

काय म्हणते अमेरिका

भारत- पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक पॉम्पियोशी चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोवाल यांनी पॉम्पियोशी मध्यरात्री फोनवर चर्चा केली. यानंतर डोवाल म्हणाले की, भारताने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर केलेला हल्ला योग्य असल्याचं अमेरिकेचं मत आहे. अमेरिकेकडून मिळालेल्या या समर्थनादरम्यान आज गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत सीमेवर चाललेल्या हालचालींवर चर्चा करण्यात आली.

VIDEO : काय आहे जीनिव्हा करार? सांगत आहेत उज्ज्वल निकम

First published: February 28, 2019, 11:32 AM IST

ताज्या बातम्या